मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 16: ‘शिवची आई आली रे...’; ‘बिग बॉस १६’च्या घरात शिव ठाकरेच्या मातोश्रींची धमाकेदार एन्ट्री

Bigg Boss 16: ‘शिवची आई आली रे...’; ‘बिग बॉस १६’च्या घरात शिव ठाकरेच्या मातोश्रींची धमाकेदार एन्ट्री

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 10, 2023 10:20 AM IST

Bigg Boss 16 Update: ‘बिग बॉस १६’च्या घरात शिव ठाकरेच्या आईची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. शिव ठाकरेच्या आईची चर्चा सध्या सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत आहे.

Bigg Boss 16 Update
Bigg Boss 16 Update

Bigg Boss 16 Update:बिग बॉस १६’च्या घरात सध्या सगळेच स्पर्धक भावूक झालेले पाहायला मिळाले आहे. सध्या या घरात फॅमिली वीक सुरू आहे. ‘बिग बॉस १६’च्या घरात बंदिस्त असलेले स्पर्धक जवळपास अडीच महिन्यांनंतर आपल्या कुटुंबाला भेटणार आहेत. यावेळी ‘बिग बॉस १६’च्या घरात शिव ठाकरेच्या आईची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. शिव ठाकरेच्या आईची चर्चा सध्या सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत आहे. ‘शिवची आई आली रे..’ म्हणत नेटकरी देखील त्यांचे स्वागत करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस १६’ आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. या शोमधील सगळेच स्पर्धक अनेकदा एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर भांडताना दिसतात. किचन रेशनपासून ते नॉमिनेशनपर्यंत अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर या घरात वाद होताना दिसले. पण, बिग बॉसचा हा आठवडा सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आणणारा ठरला आहे. या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात कैद असलेल्या सेलिब्रिटींना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी दिली जात आहे. या वेळी फराह खाननंतर शिव ठाकरेची आई देखील या घरात येताना दिसणार आहे.

कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर ‘बिग बॉस’च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये शिव ठाकरेची आई घरात येताना दिसत आहे. घरात प्रवेश केल्यावर त्यांनी पहिली शिवला मिठी मारली. यानंतर त्यांनी घरातील इतर सदस्यांशीही चर्चा केली. यावेळी त्यांनी निमृत कौर अहलुवालियाचे कौतुक केले आणि तिला हुशार खेळाडू म्हटले. तर, त्यांनी साजिद खानचे देखील कौतुक केले. यानंतर शिवचा लाडका मित्र अब्दूवर देखील त्यांनी प्रेमाचा वर्षाव केला.

मला इंगजी येत नाही. पण, मी तुझ्याशी हिंदीमध्ये बोलेन, त्यातही थोडंसं मराठी असेलच, असे त्यांनी प्रेमाने म्हटले. या घरात नुकतीच फराह खान देखील आली आहे.

IPL_Entry_Point

विभाग