मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘शाकुंतलम’च्या प्रमोशन दरम्यान स्टेजवरच समंथा प्रभूला कोसळलं रडू; चाहतेही गलबलले! Video Viral

‘शाकुंतलम’च्या प्रमोशन दरम्यान स्टेजवरच समंथा प्रभूला कोसळलं रडू; चाहतेही गलबलले! Video Viral

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 10, 2023 08:36 AM IST

Samantha Ruth Prabhu Video: ‘शाकुंतलम’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान समंथाला स्टेजवरच रडू कोसळलं. समंथाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Samantha Ruth Prabhu Video
Samantha Ruth Prabhu Video

Samantha Ruth Prabhu Video: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या ‘शाकुंतलम’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान समंथाला स्टेजवरच रडू कोसळलं. समंथाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अभिनेत्रीचे चाहते देखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती तिचे अश्रू पुसताना दिसत आहे. समंथाच्या ‘शाकुंतलम’ या पौराणिक चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात तिने तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि सिनेमावरील प्रेम यावर भाष्य केले. या दरम्यान समंथा भावूक झालेली पाहायला मिळाली.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री समंथा प्रभू सध्या मायोसिटिस नावाच्या ऑटोइम्यून आजाराने ग्रस्त आहे. अशावेळी या कार्यक्रमासाठी मी अतिशय धीर एकवटून आले आहे, असे समंथा म्हणाली. या दरम्यान समंथा प्रभू देखील भावूक झालेली पाहायला मिळाली. समंथा प्रभूचा हा व्हिडीओ शेअर करून चाहते आपले प्रेम व्यक्त करत आहेत. यावेळी समंथा म्हणाली की, ‘आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल. एक गोष्ट कधीही बदलणार नाही की, ती म्हणजे माझं चित्रपटांवरील प्रेम... मला खात्री आहे की, हे प्रेम शाकुंतलममुळे अनेक पटींनी वाढेल.’

‘शाकुंतलम’मध्ये समंथा प्रभू मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात ती मेनका आणि विश्वामित्र यांच्या मुलीची भूमिका सकारात आहे. यावेळी समंथाने यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक गुणशेखर यांचे आभार मानले. या चित्रपटासाठी आपली निवड केल्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली. काही महिन्यांपूर्वी समंथाने एका पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितले होते की, ती मायोसिटिस नावाच्या ऑटोइम्यून आजाराने ग्रस्त आहे. तर, चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान समंथा भावूक झाली आणि तिने तिच्या आरोग्याविषयी खुलासा केला.

IPL_Entry_Point