मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 16 : ‘बिग बॉस १६’च्या घरात नवा वाद, शिव ठाकरे प्रियांकावर आरोप करत म्हणाला...

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस १६’च्या घरात नवा वाद, शिव ठाकरे प्रियांकावर आरोप करत म्हणाला...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 01, 2023 08:37 AM IST

Bigg Boss 16 latest update: बिग बॉस १६चं घर सध्या युद्धाचं मैदान बनलं आहे. यात आता शिव आणि प्रियांका यांच्यात वाद होताना दिसणार आहे.

Bigg Boss 16
Bigg Boss 16

Bigg Boss 16 latest update: बिग बॉस १६चं घर सध्या युद्धाचं मैदान बनलं आहे. 'बिग बॉस'मध्ये रोज काही ना काही वाद पाहायला मिळत आहे. बिग बॉसचा १६वा सीझन आता फिनालेच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान या खेळत टिकून राहण्यासाठी सगळ्याच स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाई सुरू आहे. खेळाच्या या टप्प्यावर स्पर्धकांमध्ये भांडणे होताना दिसत आहेत. नुकत्याच एका भागात अर्चना गौतम आणि निमृत यांच्यात वाद पाहायला मिळाला. यानंतर आता शिव आणि प्रियांका यांच्यात वाद होताना दिसणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुकताच बिग बॉस १६चा एक नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये बिग बॉस शोचे तीन स्पर्धक प्रियांका, शिव ठाकरे आणि शालीन भानोत बोलतांना दिसत आहेत. बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये प्रियांका, शालीन आणि शिव यांना एक-एक करून कॉन्फरन्स रुममध्ये बोलावल्याचे दाखवण्यात आले आहे. यावेळी बिग बॉस प्रियांकाला प्रथम विचारतात की, ‘जर तुला विशेषाधिकार देण्यात आला तर तू घरात कोणावर नियंत्रण ठेवशील?’

यावर प्रियांका शिव ठाकरेचे नाव घेते. प्रियांका म्हणते की, ‘मी एक कारण सांगू शकत नाही, पण तो खूप वेगळ्या पद्धतीने पोट्रेट करतो. कोणताही शब्द पकडतो आणि त्या व्यक्तीचे चुकीचे चित्रण करतो. जर मी काही चूक केली असेल, तर त्याचा दोष मी स्वत:वर घेऊ शकते, पण अशा खोट्या गोष्टी मी स्वत:वर घेऊ शकत नाही.’

यानंतर हाच प्रश्न शालीनला विचारला जातो. त्यावर शालीन देखील शिवचे नाव घेतो. शिववर थोडं नियंत्रण ठेवायला आवडेल, कारण शिव निमृत आणि सुम्बुलला जरा जास्तच त्रास देतो. यानंतर, जेव्हा शिव ठाकरेला हाच प्रश्न विचारला जातो, तेव्हा तो प्रियांकाचे नाव घेतो. शिव म्हणतो की, ‘ती काही गोष्टी खूप खोट्या दाखवते आणि अजूनही तसाच प्रयत्न करत आहे. ती एक चांगली अभिनेत्री आहे, म्हणूनच ती सध्या खोटा अभिनय करत आहे. तिचा हाच खोटेपणा सगळ्यांसमोर आणायचा आहे.’

IPL_Entry_Point