मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Soundarya Sharma: बिग बॉस १६च्या घरातून सौंदर्या शर्मा एलिमिनेट! बाहेर पडताच म्हणाली...

Soundarya Sharma: बिग बॉस १६च्या घरातून सौंदर्या शर्मा एलिमिनेट! बाहेर पडताच म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 23, 2023 08:35 AM IST

Soundarya Sharma Eliminated From Bigg Boss 16: एलिमिनेट झाल्यानंतर बोलताना सौंदर्या म्हणाली की, या एलिमिनेशनबद्दल तिला अजिबात आश्चर्य वाटले नाही. कारण...

Soundarya Sharma Eliminated From Bigg Boss 16
Soundarya Sharma Eliminated From Bigg Boss 16

Soundarya Sharma Eliminated From Bigg Boss 16: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस १६ आता त्याच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. या शोला विजेता मिळण्यासाठी आता फक्त काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. आता या घरातून एक एक करून स्पर्धक एलिमिनेट होत आहेत. या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांनी वोटिंग केल्यामुळे सौंदर्या शर्मा घरातून बाहेर झाली आहे. अर्चना आणि निमृत कौर यांनी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण, तरीही त्यांना सौंदर्याला एलिमिनेशनपासून वाचवता आले नाही. घरातून बाहेर पडताना अर्चनाने सौंदर्याला सांगितले की, ती कोणत्याही परिस्थितीत गौतमला भेटणार नाही.

या एलिमिनेशननंतर माध्यमांशी बोलताना सौंदर्या म्हणाली की, तिला या एलिमिनेशनबद्दल अजिबात आश्चर्य वाटले नाही. हे एलिमिनेशन लोकांच्या वोटिंगने झालेले नाही, घरातील लोकांनी मिळून हा डाव खेळला आहे. या घरातील आठवणी सांगताना सौंदर्या शर्मा म्हणाली की, ‘माझा प्रवास कसाही असो, हा शो खूप चांगला होता. माझी कोणाबद्दलही काहीही तक्रार नाही.’

मी कधीही कोणत्याही गटाचा भाग नव्हते, असे सौंदर्या म्हणाली. ‘मी नेहमीच अतिशय वेगळ्या वातावरणात राहिले आहे. या शोच्या निमित्ताने पहिल्यांदाच घराबाहेर पडले आहे आणि अशा वेगवेगळ्या लोकांसोबत राहण्याचा अनुभव घेतला आहे. हा एक असा रिअॅलिटी शो होता, जिथे प्रत्येकाचा स्वतःचा गेम प्लॅन ठरलेला होता. अशा स्थितीत त्यांनी एका तगड्या स्पर्धकाला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला, जो योग्य आहे. मला कोणाबद्दलही राग नाही’, असे सौंदर्या म्हणाली.

गौतमसोबतच्या नात्याबद्दल बोलताना सौंदर्या म्हणाली की, 'मला अजूनही एक व्यक्ती म्हणून गौतमचा आदर आहे. मी नुकतीच शोमधून बाहेर पडल्यामुळे गौतमबद्दल किंवा माझ्याबद्दल बाहेर काय बोलले गेले आहे, याची माहीत नाही. माझ्याबद्दल गौतम काही म्हणाला असेल, तरी मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही. कॅमेऱ्याचे लक्ष वेधण्यासाठी लोक काहीही बोलू शकतात. मी लोकांना खाली पाडणारी किंवा घाणेरड्या कमेंट करणारी व्यक्ती नाही. मी आधी गौतमशी बोलेन आणि मगच प्रतिक्रिया देईन.’

IPL_Entry_Point