Ram Mandir Pran Pratishtha: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचं खास आमंत्रण; आलिया भट्ट-रणबीर कपूर अयोध्येला जाणार!-alia bhatt and ranbir kapoor received ayodhya ram mandir pran pratishtha invitation ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ram Mandir Pran Pratishtha: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचं खास आमंत्रण; आलिया भट्ट-रणबीर कपूर अयोध्येला जाणार!

Ram Mandir Pran Pratishtha: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचं खास आमंत्रण; आलिया भट्ट-रणबीर कपूर अयोध्येला जाणार!

Jan 08, 2024 09:29 AM IST

Ram Mandir Pran Pratishtha Invitation In Bollywood: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना देखील ‘राम लल्ला’च्या प्राणप्रतिष्ठेच आमंत्रण मिळालं आहे.

Alia Bhatt And Ranbir Kapoor received Invitation
Alia Bhatt And Ranbir Kapoor received Invitation (Taran Aadarsh/Twitter)

Ram Mandir Pran Pratishtha Invitation In Bollywood: येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात ‘राम लल्ला’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येतील हा सोहळा कोट्यवधी भाविकांसाठी खास असणार आहे. भाविकांमध्ये देखील या सोहळ्याची उत्सुकता वाढत आहे. या महत्त्वपूर्ण दिवशी अयोध्येत बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांना राम मंदिर समितीकडून आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. अभिनेते रजनीकांत यांना देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना देखील ‘राम लल्ला’च्या प्राणप्रतिष्ठेच आमंत्रण मिळालं आहे.

नुकताच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही हे खास आमंत्रण स्वीकारताना दिसले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही सदस्यांनी अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांची नुकतीच भेट घेतली. याचे काही सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दोघांच्याही हातात निमंत्रण पत्रिका आहेत. दुसऱ्या एका फोटोत त्यांना फुलांचा गुच्छ दिला जात आहे.

Golden Globe Awards 2024: ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार सोहळ्यात ‘या’ कलाकारांनी मारली बाजी! पाहा विजेत्यांची यादी...

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हे फोटो त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. यासह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘रणबीर कपूर, आलिया भट्ट यांना श्री रामजन्मभूमी मंदिर सोहळ्यासाठी आमंत्रण मिळाले. आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, आरएसएस कोकणचे प्रांतीय प्रचार प्रमुख अजय मुंडपे आणि निर्माता महावीर जैन यांनी आलिया-रणबीरची भेट घेतली. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत हा कार्यक्रम होणार आहे.’

राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला एक लाखाहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी राम मंदिराची माहिती देताना सांगितले की, ‘राम मंदिर परिसराची लांबी ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे. तर, हे मंदिर पारंपारिक नगर शैलीत रचले गेले आहे.’