Golden Globe Awards 2024 Winners: यंदाच्या ८१व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांचे आयोजन अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मोठ्या थाटात करण्यात आले आहे. चित्रपट विश्वातील हा प्रतिष्ठित ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२४’ अमेरिकन स्टँड अप कॉमेडियन जॉय कॉय होस्ट करत आहे. या वर्षी ‘बार्बी’ आणि ‘ओपेनहायमर’ यांना गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या विविध श्रेणींमध्ये सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत. तर, आता अभिनेते रॉबर्ट डाउनी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता-मोशन पिक्चर श्रेणीत ‘गोल्डन ग्लोब २०२४’ प्रदान करण्यात आला आहे. चला तर, पाहूया या पुरस्काराच्या विजेत्यांची यादी...
- ‘ओपेनहायमर’साठी अभिनेता सिलियन मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
- ‘बेस्ट परफॉर्मंस इन स्टँड अप कॉमेडी ऑन टेलीव्हिजन’ या श्रेणीतील गोल्डन ‘ग्लोब पुरस्कार २०२४’ रिकी गेर्वाईस यांनी पटकावला आहे.
- ‘बेस्ट परफॉर्मंस बाय मेल अॅक्टर इन टेलीव्हिजन सीरिज (म्युझिकल/कॉमेडी)’ हा पुरस्कार ‘द बेअर’ फेम अभिनेते जेरेमी अॅलन व्हाईट यांना मिळाला आहे.
- सर्वोत्कृष्ट पटकथा-मोशन पिक्चर या विभागात जस्टिन ट्रायट, आर्थर हरारी यांना ‘ऍनाटॉमी ऑफ अ फॉल’साठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.
- अभिनेता मॅथ्यू मॅकफॅडियन हा टेलिव्हिजन विभागातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ठरला आहे. त्याला ‘सक्सेशन’साठी ‘बेस्ट मेल सपोर्टिंग अॅक्टर टेलीव्हिजन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
- अभिनेता स्टीव्हन युन याला त्याच्या ‘बीफ’साठी ‘बेस्ट मेल अॅक्टर इन लिमिटेड सीरिज’ हा पुरस्कार मिळाला आहे.
- अभिनेत्री अली वोंग यांना लिमिटेड सीरिज, अँथॉलॉजी सीरिज किंवा मोशन पिक्चर मेड फॉर टेलिव्हिजन या श्रेणीतील ‘बेस्ट एक्ट्रेस इन लिमिटेड सीरिज’ हा पुरस्कार मिळाला आहे.
- हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियरला ‘ओपेनहायमर’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता-मोशन पिक्चर अर्थात ‘बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर-मोशन पिक्चर’ हा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे.
- दाव्हिन जॉय रँडॉल्फला ‘द होल्डओव्हर्स’मधील तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री-मोशन पिक्चर अर्थात ‘फीमेल सपोर्टिंग अॅक्टर-मोशन पिक्चर’ हा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.