मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अक्षय कुमारच्या मुलासोबत ‘ती’ मिस्ट्री गर्ल नक्की कोण? सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

अक्षय कुमारच्या मुलासोबत ‘ती’ मिस्ट्री गर्ल नक्की कोण? सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 09, 2023 08:53 AM IST

Akshay Kumar Son Aarav Kumar: सोशल मीडियावरील फोटोत आरव कुमारसोबत एक मिस्ट्री गर्ल देखील दिसली आहे. या फोटोंवरून अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

Akshay Kumar Son Aarav Kumar
Akshay Kumar Son Aarav Kumar

Akshay Kumar Son Aarav Kumar: बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र, आता अक्षय कुमार नाही, तर त्याचा मुलगा आरव कुमार चर्चेत आला आहे. अक्षयने नेहमीच आपल्या दोन्ही मुलांना मीडियापासून दूर ठेवले होते. मात्र, आता त्याचा मुलगा अनेकदा मीडिया कॅमेरांसमोर स्पॉट होताना दिसतो. सध्या आरव चर्चेत आला आहे तो त्याच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे.. या फोटोत आरव कुमारसोबत एक मिस्ट्री गर्ल देखील दिसली आहे. या फोटोंवरून सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या. मात्र, ही मिस्ट्री गर्ल आरवची मैत्रीण नसून, बहीण आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सध्या आरव कुमार आणि नाओमिकाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेकांनी आरव कुमार या मुलीला डेट करत असल्याचे म्हटले होते. मात्र, ही मुलगी आरवची मैत्रीण नसून, त्याची लहान बहीण नाओमिका आहे. नाओमिका ही ट्विंकल खन्नाची धाकटी बहीण रिंकी खन्ना हिची मुलगी आहे. आरव आणि नाओमिकाचे अनेक फोटो आणि सेल्फी सोशल मीडियावर पाहायला मिळतात. ट्विंकल खन्ना देखील या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत असते.

आरव कुमारच्या बहीणीचे नाव नाओमिका सरन असून, ती त्याच्या मावशीची मुलगी आहे. आरव कुमार हा आता २० वर्षांचा झाला असून, नाओमिका सरन ही १८ वर्षांची आहे. दोघेही नेहमीच एकत्र दिसतात. दोघांमध्ये भाऊ-बहीणीसोबतच छान मैत्रीचं नातं देखील आहे. दोघांचे सेल्फी पाहून अनेकदा त्यांच्या चाहत्यांचा गैरसमज होतो. मात्र, आता ती आरवची बहीण असल्याचे कळताच सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दोघांचेही चाहते त्यांच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

अक्षय कुमारचा मुलगा आरव हा स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेवतो. त्याचे इन्स्टाग्रामवर अकाऊंटदेखील नाही. मात्र, नाओमिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, दररोज ती तिचे नवनवे फोटो शेअर करत असते. आरव आणि नाओमिकाचे फोटो पाहून चाहते त्यांना मनोरंजन विश्वात पदार्पण करण्याचा सल्ला देत आहेत. काहींनी आरवला सोशल मीडियावर सक्रिय होण्याची विनंती केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग