मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Farah Khan Birthday: मायकल जॅक्सनचा डान्स बघून मिळाली प्रेरणा! ‘अशी’ झाली फराह खान कोरिओग्राफर

Farah Khan Birthday: मायकल जॅक्सनचा डान्स बघून मिळाली प्रेरणा! ‘अशी’ झाली फराह खान कोरिओग्राफर

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 09, 2023 09:17 AM IST

Farah Khan Birthday: बॉलिवूडमध्ये अभिनय नव्हे, तर इतर क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या महिलांमध्ये फराह खानचे नाव आवर्जून घेतले जाते.

Farah Khan
Farah Khan

Farah Khan Birthday: बॉलिवूडमध्ये अभिनय नव्हे तर इतर क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या महिलांमध्ये फराह खानचे नाव आवर्जून घेतले जाते. फराह खानने कोरिओग्राफर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र, आता ती बॉलिवूडची एक यशस्वी निर्माती, होस्ट आणि परीक्षक बनली आहे. आज (९ जानेवारी) फराह खान आपला वाढदिवस साजरा करत आहे. फराह खानचं संपूर्ण कुटुंब मनोरंजन विश्वात सक्रिय होतं. त्यामुळे आपणही याच क्षेत्राकडे वळायचं असा निर्धार तिने सुरुवातीलाच केला होता.

ट्रेंडिंग न्यूज

मनोरंजन विश्वात करिअर करायचं असं ठरवलं असलं, तरी नेमकं काय करायचं याचा निर्णय झाला नव्हता. त्यावेळी फराह कॉलेजमध्ये शिकत होती. या दरम्यान जगप्रसिद्ध पॉप सिंगर मायकल जॅक्सन याचा ‘थ्रिलर’ हा व्हिडीओ रिलीज झाला होता. या अल्बममधील मायकल जॅक्सनचा डान्स पाहून फराह खानला तिच्या करिअरची दिशा सापडली. मायकल जॅक्सनच्या डान्सने प्रभावित झालेल्या फराह खानने स्वतःचा देखील एक डान्स ग्रुप तयार केला. यानंतर फराह खानने बॉलिवूड चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला.

‘जो जिता वही सिकंदर’ या चित्रपटासाठी प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान काम करणार होत्या. मात्र, काही कारणाने त्यांनी या चित्रपटातून काढता पाय घेतला आणि हा चित्रपट फराह खानच्या वाट्याला आला. ‘जो जिता वही सिकंदर’साठी फराह खानने कोरिओग्राफर म्हणून काम केले. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. यानंतर ‘कभी हां कभी ना’च्या सेटवर तिची भेट शाहरुख खानसोबत झाली. या सेटवर दोघांची छान जोडी जमली.

‘कभी हा कभी ना’नंतर शाहरुख खान आणि फराह खान यांची जोडी बॉलिवूडमध्ये चांगलीच गाजली. शाहरुख खानच्या अनेक चित्रपटांसाठी फराह खानने कोरिओग्राफर म्हणून काम केले. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘विरासत’, ‘कुछ कुछ होता है’, ‘दिल तो पागल है’, ‘दिल से’, ‘कभी ख़ुशी कभी गम’ या चित्रपटांसाठी फराह खानने कोरिओग्राफी केली. केवळ शाहरुखच नव्हे, तर अनेक दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटींना फराह खानने आपल्या तालावर नाचवले आहे.

IPL_Entry_Point

विभाग