मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Akshay Kumar: टॉयलेट आणि सॅनिटरी पॅडनंतर अक्षय कुमार ‘या’ सामाजिक विषयावर चित्रपट बनवणार!

Akshay Kumar: टॉयलेट आणि सॅनिटरी पॅडनंतर अक्षय कुमार ‘या’ सामाजिक विषयावर चित्रपट बनवणार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 06, 2022 11:35 AM IST

Akshay Kumar: बॉलिवूडच्या खिलाडीने अर्थात अक्षय कुमार याने नुकतीच जेद्दाह आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या आगामी चित्रपटाविषयी माहिती दिली.

Akshay Kumar
Akshay Kumar

Akshay Kumar: सरतं वर्ष बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्यासाठी फार विशेष ठरलं नाही. या वर्षी आलेले त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटले आहेत. यानंतर आता अक्षय कुमार याने पुन्हा एकदा सामाजिक विषयांवरील चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी अक्षय कुमार याने ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ आणि ‘पॅडमॅन’सारखे चित्रपट केले आहेत. या चित्रपटांमधून त्याने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता अक्षय कुमार लैंगिक शिक्षणावर आधारित एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बॉलिवूडच्या खिलाडीने अर्थात अक्षय कुमार याने नुकतीच जेद्दाह आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या आगामी चित्रपटाविषयी माहिती दिली. अक्षय म्हणाला की, त्याचा आगामी चित्रपट हा लैंगिक शिक्षणावर भाष्य करणारा असेल. अद्याप या चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे. या चित्रपटाविषयी बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, ‘लैंगिक शिक्षण’ हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. अनेक ठिकाणी या विषयावर बोललं जात नाही. आपल्याकडे शाळेत अनेक विषय शिकवले जातात. मात्र, लैंगिक शिक्षण हा एक असा विषय आहे, जो सगळ्या शाळेत शिकवला जावा असे मला वाटते.’

अक्षयचा हा नवा चित्रपट एप्रिल २०२३ दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. अजून या चित्रपटाच्या कथेवर आणि इतर बाजूंवर काम सुरु आहे. लैंगिक शिक्षण हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. या चित्रपटावर अतिशय बारकाईने काम केले जाणार असून, माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून हा चित्रपट ओळखला जाईल, असं अक्षय कुमार म्हणाला.

अक्षय कुमार म्हणतो की, मला सामाजिक विषयांवर चित्रपट करायला आवडतात. अशा चित्रपटांमधून जनजागृती होते. अशा विषयांवरील चित्रपटांना व्यावसायिक चित्रपटांच्या तुलनेत कमी यश मिळत असले, तरी त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान बहुमुल्य आहे. अक्षय कुमारने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा करताच आता चाहते देखील आतुर झाले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग