मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bholaa OTT Release : घरबसल्या पाहता येणार अजय देवगणचा ‘भोला’; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्म होणार रिलीज!

Bholaa OTT Release : घरबसल्या पाहता येणार अजय देवगणचा ‘भोला’; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्म होणार रिलीज!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 18, 2023 12:20 PM IST

Ajay Devgn starrer Bholaa OTT Release: अजय देवगणच्या ‘भोला’च्या ओटीटी रिलीजची प्रेक्षक वाट पाहत आहेत. आता प्रेक्षकांची हीच प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

Bholaa OTT Release
Bholaa OTT Release

Bholaa Releasing on OTT platform: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण गेल्या काही काळापासून ‘भोला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अजय देवगणचा हा चित्रपट ३० मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाची कमाई अतिशय संथ गतीने सुरू आहे. चित्रपटगृहात थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सध्या ओटीटीकडे प्रेक्षकांचा वाढता कल आहे. एखादा चित्रपट थिएटर रिलीज झाला की, तो चित्रपट ओटीटीवर कधी येणार याची प्रेक्षक वाट पाहतात. अजय देवगणच्या ‘भोला’च्या ओटीटी रिलीजचीही प्रेक्षक वाट पाहत आहेत. आता प्रेक्षकांची हीच प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी या चित्रपटाचे डिजिटल अधिकार ओटीटी प्लॅटफॉर्मला विकले असल्याचे म्हटले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.

Ileana D'Cruz: लग्नाआधीच अभिनेत्रीने दिली गुडन्यूज! इलियाना डिक्रूझ लवकरच होणार आई!

मात्र, या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल अधिकृतपणे अद्याप काहीही सांगितले गेलेले नाही. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी या चित्रपटाचे डिजिटल अधिकार ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Video ला विकले आहेत. त्याचबरोबर येत्या काळात हा चित्रपट या ओटीटी प्लॅटफॉर्म पाहायला मिळणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या स्ट्रीमिंगची तारीख अद्याप समोर आली नाहीये. मात्र, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘भोला’ ओटीटीवर रिलीज होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘भोला’ची घोषणा झाली आणि या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ प्रदर्शित झाला तेव्हा, या चित्रपटाचा मोठा बझ निर्माण झाला होता. चित्रपटाची ही चर्चा पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करेल, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, रिलीजनंतर असे झाले नाही. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अद्याप १०० कोटींचा आकडाही ओलांडलेला नाही. आतापर्यंत या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ ८५ कोटींचीच कमाई केली आहे. परंतु, जगभरात या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग