मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ileana D'Cruz: लग्नाआधीच अभिनेत्रीने दिली गुडन्यूज! इलियाना डिक्रूझ लवकरच होणार आई!

Ileana D'Cruz: लग्नाआधीच अभिनेत्रीने दिली गुडन्यूज! इलियाना डिक्रूझ लवकरच होणार आई!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 18, 2023 11:30 AM IST

Ileana D'Cruz announces pregnancy : अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. खास फोटो शेअर करत तिने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे.

Ileana D'Cruz
Ileana D'Cruz

Ileana D'Cruz announces pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ तिच्या सिझलिंग फोटोंनी नेहमीच सोशल मीडियाचा पारा वाढवत असते. मात्र, आज इलियानाने असे फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तिचे चाहते आनंदी झाले आहेत. इलियाना नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. 'बर्फी' फेम अभिनेत्रीने आज सकाळी एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. खास फोटो शेअर करत तिने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

इलियाना डिक्रूज हिने तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत लहान मुलाचे कपडे आहेत. या छोट्याशा ड्रेसवर लिहिले आहे की, ‘आता साहसी प्रवास सुरू होणार आहे.’ तर, यातील दुसऱ्या फोटोत तिच्या गळ्यातील क्युट लॉकेट आहे, ज्यावर ‘ममा’ असे लिहिले आहे. अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लवकरच येत आहे. माझ्या प्रिय बाळा, तुला भेटण्यासाठी आता मी फार काळ वाट पाहू शकत नाही.’

इलियानाची आई आई समीरा डिक्रूझ यांनीही लेकीच्या या पोस्टवर कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे. लवकरच त्या आजी होणार असल्याने आणि घरात नातवंडं येणार असल्याने समीरा डिक्रूझ यांचा आनंद देखील गगनात मावत नाहीये. त्यांनी या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, 'माझ्या नातवंडा, या जगात लवकरच तुझे आगमन होणार आहे. तुला भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.' समीरा डिक्रूझ यांच्यासह बॉलिवूड कलाकारांनी देखील तिच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

मात्र, इलियानाची पोस्ट समोर येताच चाहत्यांनी तिला बाळाच्या वडिलांचे नाव विचारण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, तर दुसरीकडे असे बरेच लोक आहेत जे तिला बाळाच्या बाबांचे नाव आणि लग्नाबद्दल प्रश्न विचारत आहेत. तर, या पोस्टवर अशा कमेंट्स करणाऱ्यांना इलियानाच्या चाहत्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. इलियानाचे नाव अनेकांसोबत जोडले गेले होते. ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर एंड्रयू नीबोनसोबत इलियाना लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. यानंतर आता इलियानाचे नाव कतरिनाच्या भावाशी जोडले जात आहे. दोघेही कतरिनासोबत सुट्टीवर गेले होते.

IPL_Entry_Point

विभाग