मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhola Teaser: अजय देवगण आणि तब्बूच्या 'भोला'चा टीझर पाहिलात का?

Bhola Teaser: अजय देवगण आणि तब्बूच्या 'भोला'चा टीझर पाहिलात का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 24, 2023 03:52 PM IST

Ajay Devgan: ‘भोला’ हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

भोला
भोला (HT)

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा काही दिवसांपूर्वी 'दृश्यम २' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता त्यापाठोपाठ अजयचा बहुप्रतिक्षित 'भोला' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असून चर्चेत आहे.

अजय देवगणने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'भोला'चा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अनेक अॅक्शन सीन्स दिसत आहेत. तसेच अजयचा आजवर न पाहिलेला हटके लूक यामध्ये दिसत आहे. हा टीझर शेअर करत अजयने 'जब एक चट्टान १०० शैतान से टकराए' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. एकंदरीत चित्रपटाचा टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
वाचा: त्या बदनामीमुळे जीव द्यावासा वाटत होता; किरण मानेंचा धक्कादायक खुलासा

काही दिवसांपूर्वी अजय देवगणने त्याच्या ‘भोला’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये त्याने कपाळाला भस्म, हातात त्रिशूल आणि थोडा जखमी दिसत होता. त्याच्या या लूकची जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर आता अजयच्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

भोला या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजय देवगणने केली आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी सहित तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग