मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kiran Mane: त्या बदनामीमुळे जीव द्यावासा वाटत होता; किरण मानेंचा धक्कादायक खुलासा

Kiran Mane: त्या बदनामीमुळे जीव द्यावासा वाटत होता; किरण मानेंचा धक्कादायक खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 23, 2023 03:39 PM IST

Kiran Mane: बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडताच किरण माने यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे.

किरण माने
किरण माने (HT)

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. नुकताच बिग बॉस मराठी सिझन ४चा अक्षय केळकर हा विजेता ठरला. या शोमध्ये अभिनेते किरण माने देखील सहभागी झाले होते. ५२ वर्षीय किरण मानेंनी अक्षरश: प्रेक्षकांची मने जिंकली होती. शो संपल्यावर त्यांनी नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आयुष्यातील कठीण काळाविषयी वक्तव्य केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

किरण माने यांनी नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी 'मुलगी झाली हो' या मालिकेमुळे आयुष्यावर परिणाम झाल्याचे सांगितले. यामुळे नैराश्यामध्ये गेल्याचे देखील त्यांनी सांगितले. 'या मालिकेचा माझ्या आयुष्यावर प्रचंड परिणाम झाला. या मालिकेने माझे आयुष्य बदलले. माझ्यावर अनेक आरोप केले गेले. माझ्या काही सह कलाकारांनीच माझ्यावर आरोप केले. ते माझ्यासाठी धक्कादायक होते. त्यामुळे मी नैराश्यामध्ये गेले होतो. लोकांनी माझ्यावर खूप गंभीर आरोप केले होते. त्यांनी माझ्याविषयी अनेक गोष्टी पसरवल्या. त्यांच्या या ताशेऱ्यांमुळे मला काम मिळणे बंद झाले. त्यांनी माझ्याविषयी खोटं पसरवले. त्यातच मला स्वतःचा जीव घेण्याचे विचार येऊ लागले. मला आत्महत्या करावीशी वाटत होती' असे किरण माने म्हणाले.
वाचा: साजिद खानवर मिनिषा लांबाने पुन्हा केले #MeToo आरोप, म्हणाली 'त्या प्राण्याविषयी...'

पुढे ते म्हणाले, 'मी बिग बॉसच्या टीमचे आभार मानतो कारण मला जेव्हा गरज होती तेव्हा त्यांनी मदत केली. माझ्यावर एवढे मोठे संकट कोसळले असताना मी कॅमेरासमोर येण्याची आतुरतेने वाट पाहत होतो. मी माझी लढाई खूप कष्टाने लढली. मला माझे आयुष्य संपवायचे होते पण बिग बॉसने मला शोमध्ये येण्याची ऑफर दिली आणि पुन्हा जगण्याची आशा दिली.'

IPL_Entry_Point

विभाग