माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिचा पती अभिषेक बच्चन बऱ्याच दिवसांपासून लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. या दोघांच्या नात्याबद्दल लोक अनेक प्रकारच्या गोष्टी बोलताना दिसत आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबामध्ये एकप्रकारे मतभेद सुरू आहेत. मात्र, याचे ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र, आता ऐश्वर्या राय बच्चन हिने मोठे पाऊल उचलल्याचे समजत आहे. ऐश्वर्या आराध्याला घेऊन देश सोडून जाणार असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हणण्यात आले आहे.
या चर्चांदरम्यान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आराध्या बच्चनबाबतही एक मोठी बातमी समोर येत आहे. आराध्या बच्चनला परदेशात पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आराध्या तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. आता आराध्या बच्चनचा लूक पूर्णपणे बदलला आहे. आराध्याने केवळ तिचा हेअरकटच बदललेला नाही, तर तिचा ड्रेसिंग सेन्सही खूप बदलला आहे. अंबानी कुटुंबाच्या पार्टीतील तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये आराध्या अगदी तिची आई ऐश्वर्या रायसारखी दिसू लागली होती.
आराध्या बच्चन आजकाल फॅन फॉलोइंगच्या बाबतीतही मोठ्या कलाकारांना टक्कर देत आहे. आराध्या बच्चनसाठी यंदाची होळी खूप खास असल्याची बातमी आहे. ‘बॉलिवूड लाईफ’च्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या आणि अभिषेकची लाडकी लेक आराध्या लवकरच परदेशात जाऊ शकते. ऐश्वर्या रायने आपल्या मुलीला परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या रायने आपल्या मुलीला पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती पुढील काही वर्षांसाठी परदेशात राहणार असल्याचे कळते आहे. आराध्य बच्चन पुढील अभ्यासासाठी लंडनला जाऊ शकते.
सध्या आराध्या बच्चन मुंबईच्या लोकप्रिय धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये शिकत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या राय आपल्या मुलीला पुढील शिक्षणासाठी लंडन किंवा न्यूयॉर्कला पाठवू शकते. असेही म्हटले जात आहे की, ऐश्वर्या राय बच्चन हिला आपल्या मुलीला कुटुंबातील सर्व प्रकारच्या वादांपासून दूर ठेवायचे आहे आणि म्हणूनच तिने तिला परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, स्वतः ऐश्वर्या देखील आपल्या मुलीसोबत परदेशी स्थायिक होण्याची शक्यता आहे.