मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या लेकाला पाहिलेत का? डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल

ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या लेकाला पाहिलेत का? डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 23, 2024 04:15 PM IST

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडीओ ऐवजी मुलाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या लेकाला पाहिलेत का? डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल
ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या लेकाला पाहिलेत का? डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल

मराठमोळे अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे कायमच चर्चेत असणारे कपल आहे. या कपलने ९०च्या दशकातील चित्रपट गाजवले होते. आजही एक आदर्श म्हणून ओळखले जातात. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांचे एकत्र डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अनेकदा त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जाते. तरीही हे कपल शांत बसत नाही. या ट्रोलर्सला चांगलेच सुनावताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या-अविनाश यांच्या मुलाची चर्चा रंगली आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांना डान्सची आवड आहे. त्याच प्रमाणे त्यांचा अमेयला देखील लहानपणापासून डान्सची आवड आहे. तसेच त्याला अभिनयाची देखील आवड आहे. त्याने रुईया महाविद्यालयात अनेक वर्षे एकांकिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. नुकताच त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण देखील आहे. त्याने सुरुवात नाटकापासून केली आहे. त्याचे पहिले नाटक 'खरा इन्स्पेक्टर मागावर' हे आहे. आता अमेयच्या एका डान्स व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
वाचा: मी त्यांना बाबा म्हणू शकत नाही; सिद्धार्थ चांदेकरची आईच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अमेय आणि त्याची मैत्रिण ‘गोरी गौरी मांडवाखाली’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओमधील अमेयची ऊर्जा आणि डान्स पाहून नेटकरी फिदा झाले आहेत. अनेकांनी त्याच्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. कलाकार देखील या व्हिडीओवर कमेंट करत अमेयचे कौतुक करताना दिसत आहेत.
वाचा: हेमंत ढोमेचे खरे आडनाव तुम्हाला माहिती आहे का? स्वत: केला खुलासा

अभिनेत्री अश्विनी कासारने कमेंट करत, 'एनर्जी' असे म्हटले आहे. तर अविनाश नारकर यांनी कमेंट करत 'अरे फुल्ल कल्ला' असे म्हणत मुलाचे कौतुक केले आहे. तर अभिनेत्री अक्षया नाईकने 'नारू यार…किती दिवसांनी तुला नाचताना बघितलं…आने दो आने दो…' असे म्हटले आहे. अभिनेता अशोक फळदेसाईने 'खतरनाक' अशी कमेंट केली आहे.

IPL_Entry_Point