मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: अखेर ईशाने अनिरुद्धला ठणकावून सांगितलंच! ‘आई कुठे काय करते’मध्ये येणार नवं वळण

Aai Kuthe Kay Karte: अखेर ईशाने अनिरुद्धला ठणकावून सांगितलंच! ‘आई कुठे काय करते’मध्ये येणार नवं वळण

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 05, 2023 07:11 PM IST

Aai Kuthe Kay Karte Latest Update: अनिरुद्ध आणि अरुंधती यांची मुलगी ईशा ही आशुतोष केळकर याचा भाचा अनिश याच्या प्रेमात पडली आहे. मात्र, तिने आतापर्यंत तिचं हे नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं.

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte Latest Update: आई कुठे काय करते’ या मालिकेत आता आणखी एक लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. अनिरुद्धसोबतचा संसार तुटल्यानंतर आता अरुंधती हिने आशुतोषसोबत लग्नगाठ बांधली आहे. आता या मालिकेत नव्या पिढीच्या लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहेत. एकीकडे यश आणि गौरीच्या तुटलेल्या नात्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. एकीकडे संपूर्ण कुटुंब त्याला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, यातच आता अनिरुद्धची लेक ईशा देखील आता प्रेमात पडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अनिरुद्ध आणि अरुंधती यांची मुलगी ईशा ही आशुतोष केळकर याचा भाचा अनिश याच्या प्रेमात पडली आहे. मात्र, तिने आतापर्यंत तिचं हे नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. मात्र, अनिरुद्धने ईशा आणि अनिशला त्यांच्या घराबाहेर बोलताना पाहतो. यावेळी दोघांना एकत्र पाहून त्याच्या रागाचा पारा वाढतो. संतापलेला अनिरुद्ध अनिशच्या श्रीमुखात भडकावतो. आपल्या बाबांनी अनिशवर हात उचलला हे पाहून ईशाला देखील राग येतो. अनिश आपल्या मुलीला भडकावतोय असे वाटल्याने अनिरुद्ध त्याला ईशापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो.

मात्र, आता ईशा स्वतःहून पुढाकार घेऊन अनिरुद्धला आपल्या प्रेमाविषयी ठणकावून सांगणार आहे. ‘माझं अनिशवर प्रेम आणि मी त्याच्याशीच लग्न करणार’ असं ईशा अनिरुद्धला ठणकावून सांगणार आहे. यावेळी अनिरुद्ध आणखी संतापणार आहे. जर, अनिशसोबत भविष्याचा विचार करत असशील तर, आताच सोडून दे, अन्यथा परिणाम वेगळे दिसतील, असा धमकीवजा इशारा अनिरुद्ध ईशाला देणार आहे. यानंतर मात्र, ईशा देखील टोकाचं पाऊल उचलून स्वतःला एका खोलीत कोंडून घेणार आहे.

ईशाच्या या कृत्यामुळे यामुळे सगळेच चिंतेत पडले आहेत. ईशा स्वतःचं काही बरं वाईट तर करून घेणार नाही ना, याची काळजी सगळ्यांना वाटत आहे. ईशाबद्दल ऐकून आता अरुंधती देखील तत्काळ देशमुखांचं घर गाठणार असून, अनिश आणि ईशाच्या भविष्यासाठी आई म्हणून ती निर्णय घेणार आहे. मालिकेच्या येत्या भागात हा नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point