मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bhagyashree Mote: बहिणीचा संशयास्पद मृत्यू; घरची जबाबदारी भाग्यश्रीवर! अभिनेत्री म्हणते...

Bhagyashree Mote: बहिणीचा संशयास्पद मृत्यू; घरची जबाबदारी भाग्यश्रीवर! अभिनेत्री म्हणते...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 05, 2023 07:00 PM IST

Bhagyashree Mote Gets Emotional: बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांची जबाबदारी देखील भाग्यश्रीवर येऊन पडली आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या निभावताना भाग्यश्रीला पदोपदी बहिणीची आठवण येतेय.

Bhagyashree Mote
Bhagyashree Mote

Bhagyashree Mote Gets Emotional: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा गेल्या काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला. बहिणीच्या निधनानंतर भाग्यश्री आता एकाकी पडली आहे. मधूच्या निधनामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी यातून ती स्वतःला सावरून आता आयुष्याची एक नवी सुरुवात करत आहे. बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांची जबाबदारी देखील भाग्यश्रीवर येऊन पडली आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या निभावताना भाग्यश्रीला पदोपदी बहिणीची आठवण येतेय. याच दरम्यान आता तिने एक अशी पोस्ट शेअर केली आहे, जी वाचून प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी येईल.

ट्रेंडिंग न्यूज

या पोस्टमध्ये भाग्यश्री म्हणाली की, ‘बरं! मला कसं वाटतंय हे सांगण्यासाठी हे माध्यम वापरण्याची गरज नाही, परंतु कधीकधी आपण या गोष्टी केल्या पाहिजेत. माझ्या मनातील भावनांबद्दल मी कधीच बोलले नाही. पण मी अजूनही तिथेच आहे. आजकाल मला फक्त सुन्नपणा जाणवतो! मला आता अधिकाधिक एकटं वाटू लागलं आहे. नुकतीच मी माझ्या आयुष्यातील एक खास व्यक्ती गमावली. ती माझ्यासाठी माझ जग होती. तिच्या आणि माझ्या नात्याचे वर्णन करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत! ती माझ्या अस्तित्वाचं केंद्रस्थान होती.

यापुढे तिने लिहिले की, ‘मला संपूर्ण कुटुंबात ती सगळ्यात जास्त जवळची होती. तिची जागा इतर कुणीही घेऊ शकत नाही. आज ती माझ्या आयुष्यात नाही, हा विचारच खूप भयंकर आहे. जसजसे दिवस पुढे जात आहेत, तसतशी माझ्या काळजाची धडधड देखील वाढत आहे. मी अक्षरशः काही दिवस नीट झोपलेले नाही. मला तिची आठवण येते. डोळे बंद केल्यावर तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. माझे आयुष्य तिच्या आठवणींनी भरलेले आहे. आता माझ्यावर भाची आणि भाच्याच्याही जबाबदारी आहे. आता बहिणीच्या जाण्याचं दुःख बाजूला ठेवून, मला तिच्यामागे आता तिच्या व्यावहारिक जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत!’

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा, मधूचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत मिळाला. तिच्या चेहऱ्यावर जखमांचे निशाण होते. यावरून मधूची हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बहिणीच्या संशयास्पद मृत्यूनंतरही कारवाई होत नसल्याने भाग्यश्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा संताप व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग