मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  8 don 75 Trailer Out: अवयवदान का महत्त्वाचं? ‘८ दोन ७५’चा ट्रेलरही प्रेक्षकांना विचार करायला लावणार!

8 don 75 Trailer Out: अवयवदान का महत्त्वाचं? ‘८ दोन ७५’चा ट्रेलरही प्रेक्षकांना विचार करायला लावणार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 10, 2024 01:12 PM IST

8 don 75 Trailer Out: ‘८ दोन ७५’ म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर सगळ्यांच्या लक्षात येणार आहे.

8 don 75 Trailer Out
8 don 75 Trailer Out

8 don 75 Trailer Out: अवयवदान हा अत्यंत गंभीर आणि महत्त्वपूर्ण विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटसृष्टीत कमालीची उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट येत्या १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रेक्षकांना विचार करायला लावणार आहे. ‘८ दोन ७५’ म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर सगळ्यांच्या लक्षात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी!’ अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट देहदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे. देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात, हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीनं मांडण्यात आला आहे. हेच या चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसतं आहे. त्याशिवाय वैद्यकीय शिक्षणावरही या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे उत्तम स्टारकास्ट असलेला, महत्त्वाचा विषय मनोरंजक पद्धतीनं मांडणारा ‘८ दोन ७५’: फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट आता १९ जानेवारीला चित्रपटगृहात प्रेक्षकांना बघता येणार आहे.

Vicky Kaushal: सेटवर दारू पिऊन पोहोचला होता विकी कौशल! पुढे काय झालं माहितीये का?

एका महत्त्वाच्या, वेगळ्या व संवेनशील विषयावर भाष्य करणाऱ्या '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' हा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, देहदान ही संकल्पना आणि त्याबाबत जागृती करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे.

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!’ या चित्रपटाची निर्माती केली आहे. तर, सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी-सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे-विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. वैभव जोशी यांनी गीतलेखन, अवधूत गुप्ते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग