मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bollywood Singers Favorite Food: डोसा ते गुलाबजाम; तुमच्या लाडक्या गायकांना काय खायला आवडतं माहितीये का?

Bollywood Singers Favorite Food: डोसा ते गुलाबजाम; तुमच्या लाडक्या गायकांना काय खायला आवडतं माहितीये का?

Jan 09, 2024 08:37 PM IST

Bollywood Singers Favorite Food: बॉलिवूडच्या ‘या’ लोकप्रिय गायकांना काय काय खायला आवडते? चला जाणून घेऊया...

Bollywood Singers Favorite Food
Bollywood Singers Favorite Food

Bollywood Singers Favorite Food: आपल्या सुमधुर स्वरांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक गाण्यासोबतच खाण्याचेही शौकीन आहेत. श्रेया घोषालपासून ते हनी सिंहपर्यंत सगळेच कलाकार वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे चाहते आहेत. बॉलिवूडच्या ‘या’ लोकप्रिय गायकांना काय काय खायला आवडते, ते जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

श्रेया घोषाल

गायिका श्रेया घोषाल ही प्रचंड फूडी आहे. लॉकडाऊन दरम्यान, श्रेयाचे सोशल मीडिया अकाऊंट तिच्या स्वयंपाकाच्या व्हिडीओंनी भरलेले होते. बंगाली असल्याने, श्रेया घोषाल हिला बंगाली फिश करी आणि भात हा पदार्थ खूप आवडतो. याशिवाय तिला दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ देखील खूप आवडतात. चेन्नईला गेल्यानंतर ती आवर्जून डोसे, इडल्या आणि चटण्यांचा आस्वाद घेते.

बादशाह

बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाहयाला देखील राजमा-चावल हा पदार्थ खूप आवडतो. त्याने एक आठवडाभर फक्त राजमा चावल खाल्ले होते. याशिवाय बादशाह स्ट्रीट फूडचा देखील चाहता आहे. बादशाहाला मसालेदार अंडा घोटाळा खाणे आवडते.

आशा भोसले

प्रसिद्ध गायिका आशा भोसले या स्वतः जितक्या फुडी आहेत, तितक्यात त्या उत्तम सुगरण देखील आहेत. त्यांना स्वतःला मात्र, डाळ-भात आणि मिरचीचं लोणचं खायला खूप आवडतं. आशा भोसले यांना मसालेदार चटपटीत पदार्थ खायला आवडतात. आशा भोसले स्वतः घरचा गरम मसाला बनवतात.

Tharala Tar Mag 9th Jan: सायलीचा रुसवा घालवण्यासाठी अर्जुन घेणार आता चिमुकल्यांची मदत! पुढे काय होणार?

हनी सिंह

रॅपर हनी सिंहा हा प्रचंड फूडी आहे. गायक हनी सिंह याला साऊथ इंडियन पदार्थ खायला खूप आवडतात. यासोबतच त्याला अरबी आणि लेबनीज पदार्थांचीही आवड आहे.

सुनिधी चौहान

गायिका सुनिधी चौहान हिला दाल मखनी खायला खूप आवडते. तिला शाकाहारी जेवण खाणे खूप आवडते. याशिवाय तिला नॉनव्हेजमध्ये अंडी खायला आवडतात. तिच्या आईने बनवलेली अंडा करी हा तिचा सगळ्यात आवडता पदार्थ आहे.

जोनिता गांधी

गायिका जोनिता गांधी हिला तिच्या आईच्या हातचा राजमा-चावल हा पदार्थ खूप आवडतो. तिला स्वतःला फारसे जेवण बनवता येत नाही. मात्र, तिने आपल्या आईकडून हा एक पदार्थ बनवून घेणे शिकून घेतले आहे.

अरिजित सिंह

गायक अरिजित सिंह हा एक कट्टर मांसाहारी प्रेमी आहे. मात्र, त्याला शाकाहारी पदार्थही खूप आवडतात. अरिजितला बाहेरच्या जेवणापेक्षा घरी बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेणे जास्त आवडते. त्याला बिर्याणी खूप आवडते.

सोनू निगम

सोनू निगमला भारतीय आणि चायनीज पदार्थ सर्वात खूप आवडतात. विशेषतः पनीर खाणे त्याला जास्त आवडते. याशिवाय सोनूला गोड पदार्थही आवडतात. गुलाब जामुन आणि आईस्क्रीम खाण्याची त्याला विशेष आवड आहे.

श्रुती हासन

श्रुती हासनचे दक्षिण भारतीय खाद्य पदार्थांवरील प्रेम सर्वज्ञात आहे. गायिका-अभिनेत्री श्रुती हासन फिटनेस फ्रीक आहे. त्यामुळे ती घरच्या पदार्थांना जास्त प्राधान्य देते. साऊथ इंडियन खाण्यासोबतच तिला जपानी जेवण देखील आवडते.

मिका सिंह

मिका सिंह याला पोट भरून जेवायला खूप आवडते. भरपेट जेवून तो जिममध्ये तितकाच घाम देखील गाळतो. त्याला त्याच्या आईच्या हातची चिकन आणि मटण करी खूप आवडते. तर, गोड पदार्थांमध्ये तो गुलाबजाम अधिक खातो.

WhatsApp channel
विभाग