Nana Patole car accident : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भीषण अपघात झाला आहे. ते भंडारा येथून परत येत असतांना त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली. या अपघातात त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला असून ते थोडक्यात बचावले आहेत. ही घटना भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ घडली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रचार आटपून सुकळी या गावी जात असताना त्यांच्या गाडीला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.
मिळालेल्या माहीतीनुसार नाना पटोले हे काल रात्री भंडारा येथून प्रचार सभा आटोपून ते सुकळी येथे जात होते. यावेळी भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ते आले असता एक ट्रक भरधाव वेगात आला. या ट्रकने नाना पटोले यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत.
सध्या लोकसभा निवडणुका सुरू असून या साठी प्रचार सुरू आहे. या प्रचार सभेसाठी नाना पटोले हे भंडारा येथे गेले होते. हा प्रचार दौरा आटोपून ते दुसऱ्या प्रचार दौऱ्याला जात होते. यावेळी, भीलवाडा गावाजवळ ते आले असता हा अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की, पटोले यांच्या गाडीचा चक्काचूर झाला. या घटनेट पटोले हे थोडक्यात बचावले.
नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागच्या भागाचा चुराडा झाला आहे. सुदैवानं या अपघातात नाना पटोले व गाडीतील इतर जण सुरक्षित आहे. गाडीचा चुराडा होऊनही कोणालाही दुखापत झालेली नाही. अपघात होताच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस हे घटनास्थळी आले असून त्यांनी पंचनामा केला आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती पोलिस घेत आहेत. अपघाताचे कारण देखील स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, ट्रकचं नित्रंयण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वेगात असल्याने हा ट्रक पटोले यांच्या ताफ्यात घुसून हा अपघात झाला असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या