PM Modi In Chandrapur : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची भाषा, मोदींचा चंद्रपुरातून ‘इंडिया’ वर हल्लाबोल
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  PM Modi In Chandrapur : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची भाषा, मोदींचा चंद्रपुरातून ‘इंडिया’ वर हल्लाबोल

PM Modi In Chandrapur : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची भाषा, मोदींचा चंद्रपुरातून ‘इंडिया’ वर हल्लाबोल

Apr 09, 2024 12:14 AM IST

Modi In Chandrapur : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला विदर्भातून सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरातील सभेतून इंडिया आघाडी व काँग्रेसवर शरसंधान साधत घराणेशाहीवर पुन्हा एकदा टीकास्त्र डागले.

मोदींचा चंद्रपुरातून विरोधकांवर हल्लाबोल
मोदींचा चंद्रपुरातून विरोधकांवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीतील (Loksabha election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील रणधुमाळीला राज्यात विदर्भापासून सुरुवात होत आहे. चंद्रपूर मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी तब्बल १० वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरात (Modi In Chandrapur) आले होते. यावेळी आयोजित प्रचार सभेत त्यांनी इंडिया आघाडी तसेच काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

१० वर्षानंतर चंद्रपुरात आलेल्या मोदींनी नागरिकांना संबोधित करताना मराठीतून भाषणाला सुरुवात केली. मोदींनी राज्यातील जनतेला मराठीतून गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. चंद्रपूरने राम मंदिर आणि नवीन संसदेसाठी दिलेल्या योगदानाविषयी लोकांचे आभार मानले.

मोदी म्हणाले काँग्रेसची निती विभाजनाची आहे. यावेळी मोदींनी काँग्रेसला कडू कारले संबोधत म्हटले की, ते कधीच सुधरणार नाहीत. त्याला तुपात तळा किंवा साखरेत घोळा ते आहे तसेच राहणार. पीएम मोदींनी म्हटले की, काँग्रेसच्या सत्ताकाळात महाराष्ट्रावर अन्याय झाला. राज्यातही जनादेशाचा अपमान करून सरकार बनवले तेव्हाही त्यांनी केवळ आपल्या कुटूंबाचा विकास केला.

चंद्रपूरमधील सभेतून मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला. मोदी म्हणाले,  काँग्रेसच्या जाहिरनाम्यात मुस्लीम लीगची भाषा वापरली आहे. इंडिया आघाडी दक्षिण भारताला देशापासून तोडण्याची भाषा करत आहेत. सनातन धर्माला डेंग्यूची उपमा दिली जात आहे. काश्मीर हा भारताचा भाग आहे. काश्मिरी पंडितांची घरे जाळली जात असताना बाळासाहेब ठाकरे उघडपणे काँग्रेसच्या विरोधात बोलत होते. तेच बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष पुढे घेऊन जातअसल्याचं मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जनादेशाचा अनादर करत महाराष्ट्राची सत्ता हस्तगत केली. तेव्हा या लोकांनी आपल्या घराण्याचा विकास केला. कोणाचा किती हिस्सा असेल, कुठले कंत्राट कुणाला मिळेल, मलाईदार खाते कुणाकडे असेलहे डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी काम केले. महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणताही प्रकल्प आणला तरी त्यांनी कमिशनसाठी त्याला आडकाठी आणली, असा आरोप मोदींनी केला.

महाराष्ट्रात नवीन विमानतळ बनवण्याचा प्रस्ताव आला तेव्हा इंडिया आघाडीच्या नेत्यांनी कमिशनची मागणी केली. यांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली. विदर्भातील विकासासाठी होत असलेल्या समृद्धी महामार्गालाही त्यांनी विरोध केला. मुंबई मेट्रो,  कोकणातील रिफायनरीही विरोध करत लोकांना भडकावलं. मात्र सरकार बदलताच सर्व प्रकल्प मार्गी लागत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या