मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Vanchit Bahujan Aaghadi : वंचित बहुजन आघाडीकडून १० उमेदवारांची पाचवी यादी जाहीर! पाहा कुणाकुणाला मिळाली संधी?

Vanchit Bahujan Aaghadi : वंचित बहुजन आघाडीकडून १० उमेदवारांची पाचवी यादी जाहीर! पाहा कुणाकुणाला मिळाली संधी?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 11, 2024 11:11 PM IST

VBA Fifth Candidate List : वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, पालघर, रायगड, जळगाव यासह १० लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर
वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून (vanchit Bahujan aghadi) पाचवी यादी (VBA fifth candidate list) जाहीर करण्यात आली आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, पालघर, रायगड, जळगाव यासह १० लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी वंचितने ४ याद्या जाहीर करत २५ उमेदवार जाहीर केले होते. आज पाचवी यादी जाहीर करत आणखी १० उमेदवार जाहीर केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

उत्तर मुंबईतून वंचितकडून उत्तर भारतीय उमेदवार देण्यात आला आहे.तर धाराशीवमधून माजी पोलीस अधिकारीभाऊसाहेब आंधळकरांना संधी देण्यात आली आहे. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून वंचितचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. याआधी त्यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र आता उत्तर मुंबईतून बीना रामकुबेर सिंह उमेदवार असणार आहेत.

रायगडमधून कुमुदानी चव्हाण वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील तीन जागांवर वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

वंचितने जाहीर केलेली १० उमेदवारांची ५ वी यादी -

वंचितकडून आज १० जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. रायगड, धाराशिव, नंदुरबार, जळगाव, दिंडोरी, पालघर, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

  1. जळगाव- प्रफुल्ल लोढा - जैन
  2. धाराशीव- भाऊसाहेब आंधळकर - लिंगायत
  3. रायगड- कुमुदानी चव्हाण - मराठा
  4. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून अबुल हसन खान - मुस्लीम
  5. उत्तर मुंबई मतदारसंघ- बीना रामकुबेर सिंह उमेदवार - क्षत्रिय
  6. उत्तर पश्चिम मुंबई - संजीव कुलकोरी - ब्राम्हण
  7. दिंडोरी - गुलाब बरडे – भिल
  8. पालघर - विजया म्हात्रे - मल्हार कोळी -
  9. भिवंडी - निलेश सांबरे - हिंदू कुंबी
  10. नंदुरबार - हनुमंत सुर्यवंशी - टकरे कोळी

वंचितने पाचव्या यादीत मुंबईच्या तीन जागांवर उमेदवार दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली होती. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय निर्णय घेतात, ते महायुतीत सहभागी होतात का? त्यांची भूमिका काय असेल?  ते ठरल्यानंतर उमेदवार घोषित करण्याचे ठरले होते.

 

त्यानंतर आता मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई उत्तरच्या जागेसाठी उत्तर भारतीय बीना सिंह यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुंबई उत्तर पश्चिममधून संजीवकुमार कलकोरी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दक्षिण मध्य मुंबई मधून अब्दुल खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

WhatsApp channel