मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni : साक्षीच्या सांगण्यावरून धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडलं? तो व्हिडीओ आला समोर

MS Dhoni : साक्षीच्या सांगण्यावरून धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडलं? तो व्हिडीओ आला समोर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 10, 2024 02:59 PM IST

धोनीने काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तो आता फक्त आयपीएल खेळताना दिसतो. पण अलीकडेच त्याच्या निवृत्तीबाबतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

साक्षीच्या सांगण्यावरून धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडलं? तो व्हिडीओ आला समोर
साक्षीच्या सांगण्यावरून धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडलं? तो व्हिडीओ आला समोर

MS Dhoni video : टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंहग धोनी याची फॅन फॉलोइंग सर्वात जास्त आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला ३ आयसीसी खिताब जिंकून दिले आहेत आणि जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये त्याची गणना केली जाते.

ट्रेंडिंग न्यूज

धोनीने काही वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तो आता फक्त आयपीएल खेळताना दिसतो. पण अलीकडेच त्याच्या निवृत्तीबाबत एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी साक्षी त्याच्या निवृत्तीबद्दल काही खुलासे करताना दिसली.

साक्षीच्या सांगण्यावरून धोनीने निवृत्ती घेतली?

धोनीचा एक जूना व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ धोनी जेव्हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला त्यावेळचा आहे. धोनीने ३० डिसेंबर २०१४ रोजी कसोटी क्रिकेटला अलविदा केले. पत्नी साक्षीच्या सांगण्यावरून धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये समोर आले आहे. साक्षी व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे की, जर तुला मूल हवे असेल तर तु किमान एका फॉरमॅटपासून दूर व्हावे, कारण तुझ्या मुलासोबत एन्जॉय करायला तुला वेळ मिळणार नाही'.

यासोबतच साक्षी म्हणते की, झिवाचा जन्म झाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये सर्वजण सांगत होते की तुझा नवरा आला नाही, तेव्हा मी तिला सांगितले की त्याची प्राथमिकता क्रिकेट आहे आणि माझी तो प्राथमिकता आहे. अशा परिस्थितीत जी त्याची प्राथमिक आहे, ते माझेही प्राधान्य आहे.'

चाहत्यांचा गोंगाट ऐकून रसेलने कान बंद केले

दरम्यान, धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. पण त्याची फॅन फॉलोईंग काही कमी झालेली नाही. ती आणखीनच वाढली आहे. नुकताच धोनीच्या सीएसकेने केकेआविरुद्ध सामना खेळला. या सामन्यात धोनी फलंदाजीला आला तेव्हा, चेपॉकवरील प्रेक्षक वेडे झाले होते. धोनीच्या एन्ट्रीला चाहत्यांना प्रचंड जल्लोष केला. हा जल्लोष इतका प्रचंड होता, की सीमारेषेवर फिल्डिंगसाठी थांबलेल्या आंद्रे रसेलला त्याचे कान बंद करावे लागले. यावरून समजू शकते की धोनीला मैदानावर पाहण्यासाठी चाहते आजही किती आतुर आहेत.

IPL_Entry_Point