SAW vs SLW 3rd ODI Highlights : श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. खरं तर, महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने ३०० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी ३०२ धावांचे आव्हान पूर्ण केले आहे.
श्रीलंकेकडून चमारी अटापट्टूने (chamari athapaththu) १९५ धावांची तुफानी खेळी खेळली. या खेळीमुळे श्रीलंकेने ४४.३ षटकांत ३०२ धावांचे लक्ष्य गाठले. चमारी अटापट्टूने तिच्या डावात २९ चौकार आणि ५ षटकार मारले.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३०१ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने शानदार शतक झळकावले. लॉरा वोल्वार्डने १४७ चेंडूत १८४ धावांची नाबाद खेळी खेळली.
पण चमारी अटापट्टूच्या शानदार खेळीने दक्षिण आफ्रिकेची निराशा केली आणि श्रीलंकेने महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठे लक्ष्य गाठले. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने जवळपास १० वर्षांपूर्वी २०१२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध २८९ धावांचे लक्ष्य गाठले होते, मात्र आता श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मागे टाकला आहे.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ५ विकेट गमावून ३०१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार लॉरा वोल्वार्डने १४७ चेंडूत १८४ धावांची नाबाद खेळी खेळली. अशाप्रकारे श्रीलंकेसमोर ३०२ धावांचे विक्रमी लक्ष्य होते.
प्रत्युत्तरात श्रीलंकेने ४४.३ षटकांत ४ विकेट राखून लक्ष्य गाठले. श्रीलंकेसाठी चमारी अटापट्टूने २९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १९५ धावांची तुफानी खेळी केली.
संबंधित बातम्या