Rohit Sharma IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्मात आहे. टी-20 वर्ल्डकपआधी टीम इंडियासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. रोहितने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झंझावाती कामगिरी करत शतक झळकावले होते. रोहितने ६३ चेंडूत नाबाद १०५ धावा केल्या होत्या. मात्र, तो मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देऊ शकला नाही.
यानंतर आयपीएल २०२४ मधील मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना पंजाब किंग्जशी आहे. या सामन्यात रोहित नव्या बॅटने खेळताना दिसणार आहे. रोहितचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो आपली नवीन बॅट तयार करताना दिसत आहे. मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात रोहित या बॅटने मैदानात उतरू शकतो.
वास्तविक X वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रोहित त्याची बॅट खेळण्यासाठी तयार करताना दिसत आहे. ते बॅटवर स्टिकर चिकटवताना दिसत आहे आणि नंतर तो बॅटला प्रोक्टेक्टर देखील लावताना दिसत आहे. यानंतर रोहित बॅटची ग्रीप ठीक करताना दिसत आहे. कोणत्याही क्रिकेटपटूच्या हातात नवीन बॅट आली की, तो मॅचमध्ये येण्यापूर्वी त्या बॅटसोबत सराव करतो.
दरम्यान, चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ६३ चेंडूंचा सामना करत १०५ धावा केल्या होत्या. रोहितच्या या खेळीत ११ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. मात्र, असे असतानाही मुंबईला २० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. रोहितने या मोसमात आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यात त्याने २६१ धावा केल्या आहेत. नाबाद १०५ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी या हंगामात ६ सामने खेळले आहेत आणि फक्त २ सामने जिंकले आहेत. त्यांना ४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या ३ सामन्यांत मुंबईला सलग पराभवाला सामोरे जावे लागले होते.
संबंधित बातम्या