मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WTC Final 2023: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज कमबॅकच्या तयारीत

WTC Final 2023: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज कमबॅकच्या तयारीत

May 31, 2023, 01:47 PM IST

  • India vs Australia, WTC Final 2023: जोश हेजलवूडचे संघात पुनरागमन करणं भारतीय फलंदाजासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

Australia vs India

India vs Australia, WTC Final 2023: जोश हेजलवूडचे संघात पुनरागमन करणं भारतीय फलंदाजासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

  • India vs Australia, WTC Final 2023: जोश हेजलवूडचे संघात पुनरागमन करणं भारतीय फलंदाजासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

Josh Hazlewood Fitness Updates: आयपीएलचा सोळाव्या हंगामाची सांगता झाल्यानतंर आता पुन्हा सर्वांचे लक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे लागले. येत्या १ जून २०२३ पासून इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर डब्लूटीसीच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असतील. हा सामना येत्या ७ जून २०२३ पासून लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड संघात पुनरागमन करण्यासाठी मैदानात घाम गाळताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

दुखापतीमुळे जोश हेजलवूड बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. भारत दौऱ्यावर तो संघासोबत आला होता. मात्र, पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याला पुन्हा मायदेशात परतावे लागले. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळण्यासाठी मैदानात उतरलेला हेजलवूड पुन्हा अनफीट झाला. ज्यामुळे त्याला पुन्हा ऑस्ट्रेलियात जावे लागले.

आयसीसीशी संवाद साधताना जोश हेझलवूडने त्याच्या फिटनेसबद्दल म्हणाला की, "मला सध्या कोणताही दुखापत जाणवत नसून येत्या ७ जूनपूर्वी मी नेटमध्ये माझ्या पूर्ण क्षमतेनुसार गोलंदाजी करण्यावर भर देत आहे. प्रत्येक नेट सेशनमध्ये मला चांगली गोलंदाजी करायची आहे. आयपीएलमध्ये मी माझ्या क्षमतेनुसार गोलंदाजी करू शकलो नाही. आता काही आठवडे विश्रांती घेतल्यानंतर मला पूर्वीपेक्षा खूप बरे वाटत आहे."

भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा अंतिम संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडच्या नावाचाही समावेश आहे. हेझलवूडला सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर त्याच्या जागी स्कॉट बोलंडचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो.

विभाग