मराठी बातम्या  /  क्रीडा  /  SA T20 League Auction: स्टब्स सर्वात महागडा खेळाडू; तर हे दिग्गज अनसोल्ड, वाचा, लिलावात काय घडलं?

SA T20 League Auction: स्टब्स सर्वात महागडा खेळाडू; तर हे दिग्गज अनसोल्ड, वाचा, लिलावात काय घडलं?

Sep 20, 2022, 11:11 AM IST

    • SA T20 League Auction: दक्षिण आफ्रिका टी-20 लीग या स्पर्धेच्या पहिल्या मोसमात एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व संघांना IPL संघांच्या मालकांनी विकत घेतले आहे.
SA T20 League

SA T20 League Auction: दक्षिण आफ्रिका टी-20 लीग या स्पर्धेच्या पहिल्या मोसमात एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व संघांना IPL संघांच्या मालकांनी विकत घेतले आहे.

    • SA T20 League Auction: दक्षिण आफ्रिका टी-20 लीग या स्पर्धेच्या पहिल्या मोसमात एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व संघांना IPL संघांच्या मालकांनी विकत घेतले आहे.

दक्षिण आफ्रिका टी-20 लीगसाठी खेळाडूंचा लिलाव सोमवारी (१९ सप्टेंबर) पूर्ण झाला. केपटाऊनमधील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा लिलाव पार पडला. यावेळी ३१८ खेळाडूंनी बोली लावण्यात आली. मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्स या लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. स्टब्सला सनरायझर्स इस्टर्न केपने ९२ लाख रँड (अंदाजे ४.१४ कोटी रुपये) मध्ये विकत घेतले.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

या स्पर्धेच्या पहिल्या मोसमात एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व संघांना IPL संघांच्या मालकांनी विकत घेतले आहे.

या लीगमधील सहा संघ – मुंबई इंडियन्स केप टाऊन (रिलायन्स), प्रिटोरिया कॅपिटल्स (JSW), पारल रॉयल्स (रॉयल्स स्पोर्ट्स ग्रुप), डर्बन सुपर जायंट्स (RPG-संजीव गोएंका), जोहान्सबर्ग सुपर किंग्स (इंडिया सिमेंट्स), सनरायझर्स इस्टर्न केप ( सन ग्रुप).

सर्व संघांच्या पर्समध्ये प्रत्येकी १५ कोटी रुपये होते

लिलाव प्रक्रियेत प्रत्येक संघाला केवळ ३.४० कोटी रँड (सुमारे १५.३२ कोटी रुपये) खर्च करण्याची मर्यादा होती.

लिलावातील काही मोठी नावे

या लिलावात प्रिटोरिया कॅपिटल्सने रिले रोसो याला ६९ लाख रँड (३.११ कोटी रुपये) मध्ये खरेदी केले. तर मार्को यानसेनला सनरायझर्स इस्टर्न केपने ६१ लाख रँडमध्ये (२.७४ कोटी रुपये) खरेदी केले. तसेच, वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीला पार्ल रॉयल्सने ३.४ मिलियन रँड (अंदाजे १.५३ कोटी) मध्ये तर तबरेझ शम्सीला प्रिटोरिया कॅपिटल्सने ४३ लाख रँड (अंदाजे १.९३ कोटी) मध्ये खरेदी केले.

टेंबा बावुमा आणि डीन एल्गर अनसोल्ड

त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार टेंबा बावुमा आणि डीन एल्गर यांना कोणीही विकत घेतले नाही. लिलावासाठी एकूण ५३३ खेळाडूंची यादी करण्यात आली होती. मात्र यात केवळ ३१८ खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. ३१८ खेळाडूंच्या यादीत २४८ खेळाडू दक्षिण आफ्रिकेतील आहेत. ज्यात तबरेझ शम्सी, ड्वेन प्रिटोरियस आणि रस्सी व्हॅन डर डुसेन या खेळाडूंचा समावेश आहे.

परदेशी खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर इयॉन मॉर्गन, आदिल रशीद, जेसन रॉय, ओडियन स्मिथ या खेळाडूंचा या यादीत समावेश आहे.

सर्व संघात आता प्रत्येकी १७ खेळाडूंचा समावेश

या लीगच्या नियमांनुसार, प्रत्येक संघात जास्तीत जास्त १७ खेळाडू असू शकतात. लीगमधील सर्वच संघ १७ खेळाडूंचा पूल बनवण्यात यशस्वी झाले आहेत. त्याचबरोबर आयपीएलच्या धर्तीवर ४ परदेशी खेळाडूंना प्लेइंग-११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. ही स्पर्धा पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणार आहे.

लिलावानंतर १७ सदस्यीय सर्व ६ संघ-

डर्बन सुपर जायंट्स: क्विंटन डी कॉक, प्रिनेलन सुब्रायन, जेसन होल्डर, काइल मेयर्स, रीस टोपली, ड्वेन प्रिटोरियस, हेन्रिक क्लासेन, कीमो पॉल, केशव महाराज, काइल अॅबॉट, ज्युनियर डाला, दिलशान मदुशंका, जॉन्सन चार्ल्स, मॅथ्यू ख्रिश्चन जोंकर, वियान मुल्डर, सायमन हार्मर.

जोहान्सबर्ग सुपर किंग्ज : फाफ डु प्लेसिस, गेराल्ड कोएत्झी, महिश टीक्षा, रोमॅरियो शेफर्ड, हॅरी ब्रुक, जानेमन मालन, रीझा हेंड्रिक्स, काइल व्हर्न, जॉर्ज गार्टेन, अल्झारी जोसेफ, लुईस डु प्लॉय, लुईस ग्रेगरी, लिझाड फेरे विल्यम्स , नांद्रे बर्जर, मालुसी सिबोटो, कॅलेब सेलिका.

मुंबई इंडियन्स केप टाऊन: कागिसो रबाडा, डेवाल्ड ब्रेविस, रशीद खान, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, रायन रिकेल्टन, जॉर्ज लिंडे, ब्यूरन हेंड्रिक्स, डुआन जॅन्सेन, डेलानो पोटगायटर, ग्रँट रूलोफसेन, वेस्ली मार्शल, वेस्ली मार्शल स्टोन, वकार सलामखेल, झुयद अब्राम्स, ओडियन स्मिथ.

पार्ल रॉयल्स: डेव्हिड मिलर, कॉर्बिन बॉश, जोस बटलर, ओबेद मॅककॉय, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, जेसन रॉय, डेन विलास, ब्योर्न फॉर्च्युइन, विहान ल्यूब, फेरीस्को अॅडम्स, इम्रान मॅनॅक, इव्हान जोन्स, रॅमन सिमंड्स, मिचेल व्हॅन बुरेन, इऑन मॉर्गन, कोडी जोसेफ.