मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mitchell Johnson: जॉन्सनच्या हॉटेल रुममध्ये निघाला साप! फोटो शेअर करुन विचारला ‘हा’ गमतीशीर प्रश्न

Mitchell Johnson: जॉन्सनच्या हॉटेल रुममध्ये निघाला साप! फोटो शेअर करुन विचारला ‘हा’ गमतीशीर प्रश्न

Sep 19, 2022, 06:27 PM IST

    • snake in mitchell johnson hotel room: लिजेंड्स लीग क्रिकेट या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन सध्या लखनौमध्ये आहे. लखनौमधील त्याच्या हॉटेलच्या रुममध्ये एक साप निघाला आहे. या सापाचे फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 
Mitchell Johnson

snake in mitchell johnson hotel room: लिजेंड्स लीग क्रिकेट या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन सध्या लखनौमध्ये आहे. लखनौमधील त्याच्या हॉटेलच्या रुममध्ये एक साप निघाला आहे. या सापाचे फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

    • snake in mitchell johnson hotel room: लिजेंड्स लीग क्रिकेट या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन सध्या लखनौमध्ये आहे. लखनौमधील त्याच्या हॉटेलच्या रुममध्ये एक साप निघाला आहे. या सापाचे फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये इंडिया कॅपिटल्सकडून खेळत आहे. इंडिया कॅपिटल्सचा सामना बुधवारी भिलवाडा किंग्जशी होणार आहे. हा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी जॉन्सन सध्या लखनौमध्ये आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

मात्र, या दरम्यान जॉन्सनसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. मिचेल जॉन्सनच्या हॉटेलच्या रुममध्ये एक साप निघाला आहे. या सापाचा फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटमधील पहिल्या सामन्यात इंडिया कॅपिटल्सला गुजरात जायंट्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.

मिशेल जॉन्सनने आपल्या हॉटेलच्या रुममधील सापाचे तीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये त्याने या सापाचा प्रकार विचारला आहे. तसेच, तो साप त्याच्या हॉटेल रुमच्या दारावर लटकत असल्याचे लिहिले आहे.

लिजेंड क्रिकेटबद्दल बोलायचे तर, ही स्पर्धा १६ सप्टेंबरपासून सुरू झाली असून ५ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

पुढील बातम्या