मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant-Dinesh Karthik: प्लेइंग-11 मध्ये पंत की कार्तिक? सुनील गावस्करांनी स्पष्टच सांगितलं

Rishabh Pant-Dinesh Karthik: प्लेइंग-11 मध्ये पंत की कार्तिक? सुनील गावस्करांनी स्पष्टच सांगितलं

Sep 19, 2022, 05:14 PM IST

    • Sunil Gavaskar on Dinesh Karthik & rishabh pant: दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांच्यात कोणाला संधी द्यायची, याबाबत बराच काळ वाद सुरू आहे. यावर माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी आपलं मत मांडलं आहे.
sunil gavaskar

Sunil Gavaskar on Dinesh Karthik & rishabh pant: दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांच्यात कोणाला संधी द्यायची, याबाबत बराच काळ वाद सुरू आहे. यावर माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी आपलं मत मांडलं आहे.

    • Sunil Gavaskar on Dinesh Karthik & rishabh pant: दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांच्यात कोणाला संधी द्यायची, याबाबत बराच काळ वाद सुरू आहे. यावर माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी आपलं मत मांडलं आहे.

टीम इंडियाने टी-20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. मात्र अजूनही अनेक गोष्टींबाबत संभ्रम आहे. दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यापैकी कोणाला प्लेइंग-११ मध्ये सामील करायचे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी यावर आपलं मत मांडलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सुनील गावस्कर काय म्हणाले

सुनील गावस्करांनी सांगितले की, "त्यांना ऋषभ आणि दिनेश कार्तिक या दोघांचाही प्लेइंग-११ मध्ये समावेश करायला आवडेल. पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंत, सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या त्यानंतर दिनेश कार्तिक सातव्या क्रमांकावर खेळू शकतो.

तसेच, "हार्दिक पांड्याशिवाय संघात ४ गोलंदाजांचे पर्याय असू शकतात. जर तुम्ही धोका पत्करला नाही तर जिंकणार कसे. तुमच्या प्रत्येक विभागात तुम्हाला धोका पत्करावा लागेल", असेही गावस्कर म्हणाले.

दरम्यान दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांच्यात कोणाला संधी द्यायची याबाबत बराच काळ वाद सुरू आहे.

आशिया चषकात ऋषभ पंत फ्लॉप

ऋषभ पंतची T20 फॉरमॅटमध्ये कामगिरी तितकी चांगली नाही, तर दिनेश कार्तिकने IPL २०२२ पासून आपल्या खेळात खूप सुधारणा केली आहे आणि तो फिनिशर म्हणून उदयास आला आहे. आशिया चषकात दिनेश कार्तिकला फक्त एकच सामना मिळाला, बाकीच्या सामन्यात ऋषभ पंतला संधी मिळाली, पण तो अपयशी ठरला.

T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप शरदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

पुढील बातम्या