मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Gautam Gambhir: 'कोहली-धोनीची पूजा करणं बंद करा...', जाणून घ्या, गौतम गंभीर असं का म्हणाला?

Gautam Gambhir: 'कोहली-धोनीची पूजा करणं बंद करा...', जाणून घ्या, गौतम गंभीर असं का म्हणाला?

Sep 19, 2022, 03:06 PM IST

    • Gautam Gambhir on ms dhoni and virat kohli: भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडूंना हिरो बनवणाऱ्या संस्कृतीवर गौतम गंभीरने मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. "विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यासारखे मोठे स्टार खेळाडू सोडून आपण भारतीय क्रिकेट कसे पुढे नेऊ शकतो, याबद्दल बोलले पाहिजे, असे तो म्हणाला आहे. तसेच, भारतीय क्रिकेट मोठे असले पाहिजे, ना की एखादी विशिष्ट व्यक्ती", असे गंभीर म्हणाला आहे.
Gautam Gambhir

Gautam Gambhir on ms dhoni and virat kohli: भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडूंना हिरो बनवणाऱ्या संस्कृतीवर गौतम गंभीरने मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. "विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यासारखे मोठे स्टार खेळाडू सोडून आपण भारतीय क्रिकेट कसे पुढे नेऊ शकतो, याबद्दल बोलले पाहिजे, असे तो म्हणाला आहे. तसेच, भारतीय क्रिकेट मोठे असले पाहिजे, ना की एखादी विशिष्ट व्यक्ती", असे गंभीर म्हणाला आहे.

    • Gautam Gambhir on ms dhoni and virat kohli: भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडूंना हिरो बनवणाऱ्या संस्कृतीवर गौतम गंभीरने मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. "विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यासारखे मोठे स्टार खेळाडू सोडून आपण भारतीय क्रिकेट कसे पुढे नेऊ शकतो, याबद्दल बोलले पाहिजे, असे तो म्हणाला आहे. तसेच, भारतीय क्रिकेट मोठे असले पाहिजे, ना की एखादी विशिष्ट व्यक्ती", असे गंभीर म्हणाला आहे.

गौतम गंभीर त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असतो. रोखठोक वक्तव्ये करायला तो मागेपुढे पाहत नाही. अशातच गंभीरने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट आणि खेळाडूंच्या स्टार स्टेटसबद्दल रोखठोक मत मांडले आहे. लोकांनी भारतीय क्रिकेटपटूंची देवाप्रमाणे पूजा करणे बंद करावे, असे गंभीरने म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांसारखे स्टार खेळाडू सोडून आपण क्रिकेट आणि संघाबद्दल बोलायला हवे, असे तो म्हणाला आहे. त्याच वेळी, एका विशिष्ट खेळाडूवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण संपुर्ण संघावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही गंभीर म्हणाला. तो एका कार्यक्रमात बोलत होता.

गंभीर नेमके काय म्हणाला

“ड्रेसिंग रूममध्ये स्टार किंवा हिरो तयार करू नका. भारतीय क्रिकेट हाच खरा हिरो असला पाहिजे, एखादी व्यक्ती नाही. एखाद्या विशिष्ट खेळाडूला मोठे करण्याऐवजी संपूर्ण संघ मोठा करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे”.

विराटबद्दल सर्वजण बोलले, मात्र भुवीकडे दुर्लक्ष झाले

आशिया चषकातील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याचा संदर्भ देताना गंभीर म्हणाला, “ज्या दिवशी विराट कोहलीने त्याचे ७१ वे शतक झळकावले, त्याच दिवशी गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही त्याच सामन्यात ५ विकेट घेतल्या. पण, त्याच्याबद्दल कुणीही बोलले नाही. हे खरोखरच दुर्दैवी आहे. कॉमेंट्री करताना भुवनेश्वरबद्दल सतत चर्चा करणारा मी एकमेव व्यक्ती होतो. भुवनेश्वरने ४ षटकात ५ विकेट घेतल्या होत्या. पण मला वाटत नाही इतर कोणाला हे माहित असेल”.

देशाने हिरोच्या संस्कृतीतून बाहेर यायला हवे

गंभीर पुढे म्हणाला की, 'विराट कोहलीने शतक झळकावले तेव्हा संपूर्ण देश जल्लोष करत होता. भारताला हिरोच्या संस्कृतीतून बाहेर यायला हवे. मग ते क्रिकेट असो वा राजकारण. आपल्याला फक्त भारतीय क्रिकेटची पूजा करायची आहे.

सोशल मीडिया फॉलोअर्स सर्वात बनावट गोष्ट

भारतीय क्रिकेटमधील हिरो संस्कृती दोन कारणांमुळे वाढली. एक म्हणजे सोशल मीडिया फॉलोअर्स, जे कदाचित या देशातील सर्वात बनावट गोष्ट आहे, कारण तुमचे फॉलोअर्स किती आहेत यावरूनच तुमचे स्टेटस ठरवले जाते. त्यातूनच एक ब्रँड बनतो. दुसरे कारण म्हणजे, इतर माध्यमे आणि ब्रॉडकास्टर्स".

हे सर्व कोणी सुरु केले

गंभीर पुढे म्हणाला, 'जर तुम्ही एखाद्या माणसाबद्दल रोज बोलत राहिलात तर एक दिवस तो आपोआपच ब्रँड बनतो. हे १९८३ मध्ये पहिल्यांदा घडले होते. १९८३ मध्ये भारताने पहिला विश्वचषक जिंकल्यावर याची सुरुवात झाली. तेव्हापासून फक्त कपिव देव यांच्याच चर्चा सुरू आहेत. त्यानंतर २००७ आणि २०११ मध्ये आम्ही विश्वचषक जिंकला, त्यानंतर धोनीच्या चर्चा सुरू झाल्या.

हे सर्व कोणी सुरू केले? कोणत्याही खेळाडूने किंवा बीसीसीआयने हे सुरु केले नाही. तर वृत्तवाहिन्या किंवा ब्रॉडकास्टर्सने हे सर्व सुरु केले आहे. ते कधी भारतीय क्रिकेटबद्दल बोलकाना दिसले आहेत का? भारतीय क्रिकेट फक्त एक व्यक्ती नाही तर ड्रेसिंग रूममध्ये बसून १५ लोक चालवतात. प्रत्येकाचे आपापले योगदान आहे.

पुढील बातम्या