मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs AUS: कॅप्टन रोहितसमोर प्लेइंग-११ निवडण्याचं टेन्शन, पाहा अंतिम अकरामध्ये यांना मिळणार संधी?

IND vs AUS: कॅप्टन रोहितसमोर प्लेइंग-११ निवडण्याचं टेन्शन, पाहा अंतिम अकरामध्ये यांना मिळणार संधी?

Sep 19, 2022, 08:30 PM IST

    • india playing 11 prediction: मोहम्मद शमीला मालिकेपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे, अशा परिस्थितीत तोही मालिकेतून बाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत मोहालीत होणाऱ्या पहिल्या टी-20 मध्ये भारत कोणत्या प्लेइंग-११ सह उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
IND vs AUS

india playing 11 prediction: मोहम्मद शमीला मालिकेपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे, अशा परिस्थितीत तोही मालिकेतून बाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत मोहालीत होणाऱ्या पहिल्या टी-20 मध्ये भारत कोणत्या प्लेइंग-११ सह उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    • india playing 11 prediction: मोहम्मद शमीला मालिकेपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे, अशा परिस्थितीत तोही मालिकेतून बाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत मोहालीत होणाऱ्या पहिल्या टी-20 मध्ये भारत कोणत्या प्लेइंग-११ सह उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 सामना २० सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग-११ काय असेल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. कारण रवींद्र जडेजा या मालिकेचा भाग नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

मोहम्मद शमीला मालिकेपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे, अशा परिस्थितीत तोही मालिकेतून बाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत मोहालीत होणाऱ्या पहिल्या टी-20 मध्ये भारत कोणत्या प्लेइंग-११ सह उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

T20 विश्वचषकापूर्वी, भारत स्वतःची तयारी कशी करतो हे पाहण्याची ही शेवटची संधी आहे. कर्णधार रोहित शर्माने आधीच सांगितले आहे की प्रयोग आणि तयारीची वेळ आता संपली आहे.आता सर्व योजना अंमलात आणण्याची पाळी आहे.

उमेश यादवला प्लेइंग-११ मध्ये जागा मिळणे कठीण

मोहम्मद शमीच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या उमेश यादवला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळवणे कठीण मानले जात आहे. कारण टीम इंडिया केवळ ४ मेन गोलंदाजांसह खेळणार असल्याचे मानले जात आहे. याशिवाय काही अष्टपैलू खेळाडूही प्लेइंग-११ मध्ये असतील.

विशेष म्हणजे, ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यात कोणाला स्थान मिळते यावर विचारमंथन होणार आहे. ऋषभ पंतची T20 फॉरमॅटमधील कामगिरी खुपच खराब आहे. पण डावखुरा फलंदाज म्हणून त्याला संधी मिळू शकते.

कर्णधार रोहित शर्मा ७+४ या फॉर्म्युलासह मैदानात उतरतो की, ६+५ फॉर्म्युला कायम ठेवतो. यावर बरेच काही अवलंबून असेल. कारण ७ फलंदाज खेळले तर हार्दिक पांड्याला पूर्ण ४ षटके टाकावी लागतील.

पहिल्या टी-२० सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह.

पुढील बातम्या