मराठी बातम्या  /  क्रीडा  /  SL vs NZ Test : ६ चेंडू ८ धावा आणि अंगावर काटा आणणारा थरार, शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं? पाहा

SL vs NZ Test : ६ चेंडू ८ धावा आणि अंगावर काटा आणणारा थरार, शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं? पाहा

Mar 13, 2023, 01:40 PM IST

    • SL vs nz 1st test match 2023 highlights :  न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात (sri lanka vs new zeland last over drama) न्यूझीलंडने २ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात केन विल्यमसनने धावांचा पाठलाग करताना शतक झळकावले. त्याने १९४ चेंडूत नाबाद १२१ धावा केल्या.
SL vs nz 1st test match last over

SL vs nz 1st test match 2023 highlights : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात (sri lanka vs new zeland last over drama) न्यूझीलंडने २ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात केन विल्यमसनने धावांचा पाठलाग करताना शतक झळकावले. त्याने १९४ चेंडूत नाबाद १२१ धावा केल्या.

    • SL vs nz 1st test match 2023 highlights :  न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात (sri lanka vs new zeland last over drama) न्यूझीलंडने २ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात केन विल्यमसनने धावांचा पाठलाग करताना शतक झळकावले. त्याने १९४ चेंडूत नाबाद १२१ धावा केल्या.

SL vs nz 1st test match last over : कोण म्हणतंय की कसोटी क्रिकेटमध्ये रोमांच नसतो. असे म्हणणाऱ्यांनी एकदा न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळलेली क्राइस्टचर्च कसोटी पाहावी. हा सामना टी-२० सामन्याच्या थरारापेक्षा कमी नव्हता. हा कसोटी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. यात न्यूझीलंडने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

ट्रेंडिंग न्यूज

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

न्यूझीलंडला सामन्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या षटकात विजयासाठी ८ धावा करायच्या होत्या. त्यांच्या ३ विकेट्स शिल्लक होत्या. पण, श्रीलंकेच्या खेळाडूंनी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेचला.

शेवटच्या षटकात काय घडलं?

श्रीलंकेकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी असिथा फर्नांडो आला. त्याने पहिल्या २ चेंडूत ३ धावा केल्या. यानंतर तिसऱ्या चेंडूवर मॅट हेन्री धावबाद झाला. आता पुढच्या ३ चेंडूत ५ धावा हव्या होत्या आणि दोन विकेट बाकी होत्या. सामना दोन्ही संघांच्या हातात होता. पण, जोपर्यंत केन विल्यमसन होता तोपर्यंत न्यूझीलंडचे पारडे जड होते. यानंतर चौथ्या चेंडूवर विल्यमसनने चौकार मारून संघाचे काम सोपे केले. या चौकाराने श्रीलंकेचे टेन्शन वाढले. पण गोलंदाज फर्नांडोने मन शांत ठेवले.

शेवटच्या २ चेंडूंवर किवीजला १ धावा करायची होती. फर्नांडोने ५वा चेंडू डॉट टाकला. परिणामी सामन्याचा थरार पुन्हा एकदा उंचावला. आता १ चेंडू आणि १ धाव हवी होती. शेवटच्या लेग बायच्या रुपात ही धाव आली आणि संघाने थरारक विजय मिळवला. विशेष म्हणजे विल्यमसन धावबाद होण्यापासून थोडक्यात वाचला.

श्रीलंका-न्यूझीलंड कसोटीत काय घडलं?

क्राइस्टचर्च कसोटी जिंकण्यासाठी श्रीलंकेने न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेने ३५५ धावांची मोठी धावसंख्या उभारली, प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३७३ धावा केल्या. न्यूझीलंडसाठी डिरेल मिशेलने शानदार शतक झळकावले. पण प्रत्युत्तरात श्रीलंकेने दुसऱ्या डावात पलटवार करत ३०२ धावा केल्या, त्यात अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाचा समावेश होता.

अशा परिस्थितीत न्यूझीलंडला विजयासाठी २८५ धावांचे लक्ष्य मिळाले, शेवटच्या दिवशी हे लक्ष्य गाठणे अवघड होते, मात्र, अशक्य नव्हते. यानंतर न्यूझीलंडने हा सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला आणि शेवटी विजय मिळवला.