मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sanju Samson Video: रोहित-डीकेसमोर संजूच्या नावाचा जयघोष, व्हिडीओ पाहा

Sanju Samson Video: रोहित-डीकेसमोर संजूच्या नावाचा जयघोष, व्हिडीओ पाहा

Aug 09, 2022, 08:33 PM IST

    • Sanju Samson Video: टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसनची फॅन फॉलोइंग खूपच जबरदस्त आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथेही संजूचे चाहते त्याचा जयघोष करताना पाहायला मिळाले आहेत.
sanju samson

Sanju Samson Video: टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसनची फॅन फॉलोइंग खूपच जबरदस्त आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथेही संजूचे चाहते त्याचा जयघोष करताना पाहायला मिळाले आहेत.

    • Sanju Samson Video: टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसनची फॅन फॉलोइंग खूपच जबरदस्त आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथेही संजूचे चाहते त्याचा जयघोष करताना पाहायला मिळाले आहेत.

टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील शेवटच्या शेवटच्या सामन्यानंतरचा आहे. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा गोल्फ कार घेऊन मैदानावर पोहोचाला होता. संघातील अनेक खेळाडूही त्याची सवारी करण्यासाठी मैदानात पोहोचले होते. यावेळी रोहितच्या कारमध्ये संजू सॅमसनही होता.

ट्रेंडिंग न्यूज

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी त्याला पाहून संजू-संजूचा जयघोष सुरू केला. तेव्हा या संजूने गाडीतून खाली उतरून सर्वांना सॅल्युट ठोकला. संजूच्या या प्रतिक्रियेचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

दरम्यान, आशिया चषक २०२२ साठी संजूची टीम इंडियामध्ये निवड झालेली नाही. त्यामुळे संजूच्या चाहत्यांमध्ये प्रचंड राग आहे. २७ वर्षीय सॅमसनने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो सतत भारतीय संघात आता-बाहेर होत असतो. त्याला संघात पक्के स्थान मिळवता आलेले नाही. संजूने टीम इंडियासाठी आतापर्यंत ४ एकदिवसीय आणि १६ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

यादरम्यान, त्याने दोन्ही फॉरमॅटमध्ये अनुक्रमे ३९.३३ च्या सरासरीने ११८ आणि २१.१४ च्या सरासरीने २९६ धावा केल्या आहेत.

भारताने ४-१ ने मालिका जिंकली

भारताने वनडे मालिकेनंतर वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकाही जिंकली आहे. ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने ८८ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकून भारताने मालिकाही ४-१ ने खिशात घातली.