मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sania Mirza Career: ६व्या वर्षी टेनिसला सुरुवात, ६ ग्रँडस्लॅम जेतेपदं; असं आहे सानियाचं सोनेरी करिअर

Sania Mirza Career: ६व्या वर्षी टेनिसला सुरुवात, ६ ग्रँडस्लॅम जेतेपदं; असं आहे सानियाचं सोनेरी करिअर

Jan 07, 2023, 12:40 PM IST

    • Sania Mirza Retirement: सानियाने लहान वयात टेनिस खेळायला सुरुवात केली आणि जागतिक स्तरावर भारताचा मान अनेकवेळा उंचावला. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि बक्षिसे जिंकली. तिच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया...
Sania Mirza Career

Sania Mirza Retirement: सानियाने लहान वयात टेनिस खेळायला सुरुवात केली आणि जागतिक स्तरावर भारताचा मान अनेकवेळा उंचावला. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि बक्षिसे जिंकली. तिच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया...

    • Sania Mirza Retirement: सानियाने लहान वयात टेनिस खेळायला सुरुवात केली आणि जागतिक स्तरावर भारताचा मान अनेकवेळा उंचावला. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि बक्षिसे जिंकली. तिच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया...

भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर आपल्या करिअरचा शेवट करणार असल्याचे सानिया मिर्झाने म्हटले आहे. सानिया मिर्झा या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिची शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळणार आहे. सानियाने यूएस ओपन २०२२ मध्ये टेनिसमधून निवृत्ती घेण्याची योजना आखली होती परंतु दुखापतीमुळे तिला ग्रँड स्लॅमला मुकावे लागले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

सानियाने लहान वयात टेनिस खेळायला सुरुवात केली आणि जागतिक स्तरावर भारताचा मान अनेक वेळा उंचावला. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि बक्षिसे जिंकली. तिच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया...

वयाच्या ६व्या वर्षी टेनिसचे धडे घ्यायला सुरुवात

सानिया मिर्झाचा जन्म १५ नोव्हेंबर १९८६ रोजी मुंबईत झाला. तिचे बालपण हैदराबादमध्ये गेले. जन्मानंतर सानियाचे वडील इम्रान मिर्झा कामानिमित्त हैदराबादला स्थायिक झाले. इम्रान मिर्झा हे क्रीडा पत्रकार होते. पुढे त्यांनी प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला. सानिया केवळ ६ वर्षांची असताना तिच्या वडिलांनी सानियाला हैदराबादच्या निजाम क्लबमध्ये प्रवेश मिळवून दिला. तिथल्या प्रशिक्षकाने एवढ्या लहान मुलीला शिकवण्यास प्रथम नकार दिला होता. मात्र, तरी सानिया मिर्झाचे टेनिस कौशल्य पाहून त्यांनी ट्रेनिंग देण्याचे मान्य केले.

सानियाने खूप मेहनत घेतली

सानियाने लहान वयातच टेनिसचा सराव सुरू केला. तिचे पहिले टेनिस गुरू माजी खेळाडू महेश भूपती आहेत. ज्यांनी सानियाला टेनिसचे सुरुवातीचे धडे दिले. नंतर, सानियाने सिकंदराबाद येथील सिनेट टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आणि नंतर ती अमेरिकेत गेली. तिथे तिने एस टेनिस अकादमीमध्ये प्रवेश केला.

१९९९ मध्ये खेळली पहिली व्यावसायिक स्पर्धा

सानिया मिर्झाने १९९९ मध्ये जकार्ता येथील जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये तिची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली होती. नंतर २००३ मध्ये विम्बल्डन चॅम्पियनशिप मुलींच्या दुहेरीतही विजेतेपद पटकावले. त्यानंतर त्याच वर्षी ती यूएस ओपन मुलींच्या दुहेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचली. सानियाने आफ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धेत ४ सुवर्णपदके जिंकली. सुरुवातीला सानिया एकेरीतही भाग घ्यायची.

एकेरीत सानियाने २००५ आणि २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनची तिसरी फेरी गाठली होती. तसेच, सानियाने २००५, २००७, २००८ आणि २००९ मध्ये विम्बल्डनची दुसरी फेरी गाठली. हीच तिची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. २००५ मध्ये, सानियाने यूएस ओपनची चौथी फेरी गाठली होती. ही या स्पर्धेतील तिची सर्वोत्तम कामगिरी राहिली. त्याचवेळी फ्रेंच ओपनमध्ये सानियाने २००७ आणि २०११ मध्ये दुसरी फेरी गाठली होती. एकेरीत फारसे यश न मिळाल्यानंतर सानियाने दुहेरीत हात आजमावला.

सानियाने २००९ मध्ये पहिले ग्रँडस्लॅम जिंकले

२००९ मध्ये, सानियाने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महेश भूपतीसह मिश्र दुहेरीत पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. यानंतर तिने २०१२ मध्ये फ्रेंच ओपन आणि २०१४ मध्ये यूएस ओपन मिश्र दुहेरीत विजेतेपद जिंकले. सानिया मिर्झाने तिच्या कारकिर्दीत जवळपास ६ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. मिश्र दुहेरीशिवाय सानियाने महिला दुहेरीतही तीन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. सानिया आणि माजी स्टार मार्टिना हिंगीसची जोडी चांगलीच यशस्वी ठरली. दोघींनी सोबत एकूण १४ जेतेपदे जिंकली. यामध्ये २०१६ मधील ऑस्ट्रेलियन ओपन, २०१५ मधील विम्बल्डन आणि यूएस ओपनचा समावेश आहे

सानिया मिर्झाने दोन ऑलिम्पिकही खेळले

सानियाने ऑलिम्पिकमध्येही सहभाग घेतला आहे. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सानिया एकेरीत पहिल्याच फेरीत बाहेर पडली होती. तर महिला दुहेरीत ती दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचली होती. याशिवाय २०१६ मध्ये तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत भाग घेतला आणि उपांत्य फेरी गाठली होती.

सानियाला खेलरत्न पुरस्कार

सानिया मिर्झाला अर्जुन पुरस्कार (२००४), पद्मश्री (२००६), खेलरत्न (२०१५) आणि पद्मभूषण (२०१६) ने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सानिया मिर्झाने २०१० मध्ये पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शोएब मलिकसोबत खूप दिवस डेट केल्यानंतर लग्न केले. सानियाने ३० ऑक्टोबर २०१८ रोजी इझान मिर्झा मलिक या मुलाला जन्म दिला. सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या बातम्याही गेल्या वर्षी समोर आल्या होत्या, मात्र दोघांनीही यावर काहीही बोलण्यास नकार दिला. सध्या दोघेही एक पाकिस्तानी शो मिर्झा-मलिक शो होस्ट करत आहेत.