मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sarfaraz Ahmed: सर्फराजची पत्नी ढसाढसा रडली! अपमान करून संघातून काढलं होतं; आज त्यानेच वाचवली लाज

Sarfaraz Ahmed: सर्फराजची पत्नी ढसाढसा रडली! अपमान करून संघातून काढलं होतं; आज त्यानेच वाचवली लाज

Jan 07, 2023, 11:11 AM IST

    • Sarfaraz Ahmed Wife Syeda Khusbaht In Tears: पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमदने कसोटी क्रिकेटमध्ये धडाकेबाज पुनरागमन केले आहे. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात अर्धशतके झळकावल्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याने शतक झळकावले. सर्फराजने शतक झळकावून संघाला लाजिरवाण्या पराभवापासून वाचवले.
Sarfaraz Ahmed

Sarfaraz Ahmed Wife Syeda Khusbaht In Tears: पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमदने कसोटी क्रिकेटमध्ये धडाकेबाज पुनरागमन केले आहे. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात अर्धशतके झळकावल्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याने शतक झळकावले. सर्फराजने शतक झळकावून संघाला लाजिरवाण्या पराभवापासून वाचवले.

    • Sarfaraz Ahmed Wife Syeda Khusbaht In Tears: पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमदने कसोटी क्रिकेटमध्ये धडाकेबाज पुनरागमन केले आहे. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात अर्धशतके झळकावल्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याने शतक झळकावले. सर्फराजने शतक झळकावून संघाला लाजिरवाण्या पराभवापासून वाचवले.

Pakistan vs New Zealand, 2nd Test highlights: पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमदने ८ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी शेवटच्या दिवशी दिवसभर फलंदाजी केली आणि धडाकेबाज शतक केले. त्यामुळे पाकिस्तानचा संघ पराभवापासून वाचला आणि दुसरी कसोटी अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सर्फराजने पहिल्या सामन्यात २ अर्धशतके झळकावली होती आणि आता दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक ठोकले. सर्फराजने शतक झाल्यानंतर प्रेक्षकांच्या दिशेने बॅट उंचावून सेलिब्रेश केले, तेव्हा त्याच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. या भावूक क्षणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत प्लेईंग ११ मध्ये सर्फराजची निवड झाली, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण मोहम्मद रिझवानच्या जागी त्याला संघात स्थान मिळाले होते. सर्फराज जवळपास ३ वर्षांनंतर सामना खेळत होता. मात्र, सर्फराजने मिळालेल्या संधीचे सोने करत धडाकेबाज पुनरागमन केले. 

सामना जिंकण्यासाठी ३१९ धावांचे लक्ष्य

न्यूझीलंडने पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी ३१९ धावांचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तानचे शुन्यावर दोन फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर शेवटच्या दिवशी पाकिस्तानला सामना वाचवण्यासाठी संपूर्ण दिवस खेळून काढणे आवश्यक होते. तर न्यूझीलंडला ८ विकेट्स घ्यायच्या होत्या. मात्र, सर्फराजने संपूर्ण दिवस खेळून काढला. तो सामन्याची ३ षटके शिल्लक राहिली असताना बाद झाला. त्याने १७६ चेंडूंचा सामना करताना ९ चौकार आणि एका षटकारासह ११८ धावा केल्या. 

रिझवानमुळे सर्फराज ३ वर्षांपासून संघाबाहेर

सर्फराजने शतक झळकावल्यानंतर त्याची पत्नी सय्यदा खुशबाहत आणि कुटुंबीय भावूक झाले. सय्यदाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तिला अश्रू अनावर झाले. सर्फराजने ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. तसेच त्याचे पाकिस्तानमधील हे पहिले कसोटी शतक होते. २०१९ मध्ये सर्फराजची कसोटी कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती आणि त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले होते.

मोहम्मद रिझवानमुळे त्याला बराच काळ संघात संधी मिळाली नाही. सर्फराजने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ८६ आणि त्यानंतर ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

सामन्यात काय घडलं?

दरम्यान, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने पहिल्या डावात ४४९ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून पहिल्या डावात डेवॉन कॉनवेने शतकी खेळी खेळली होती. त्याने १२२ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव ४०८ धावांवर आटोपला. त्यांच्याकडून सौद शकीलने सर्वाधिक १२५ धावांची खेळी खेळली. 

त्यानंतर न्यूझीलंडने आपला दुसरा डाव ५ बाद २७७ धावांवर घोषित केला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर पाकिस्तानला ३१९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. शेवटच्या दिवशी पाकिस्तानने ९ बाद ३०४ धावाच करता आल्या.

 

पुढील बातम्या