मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sania Mirza Retirement: सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा, 'ही' असेल शेवटची स्पर्धा

Sania Mirza Retirement: सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा, 'ही' असेल शेवटची स्पर्धा

Jan 07, 2023, 12:10 PM IST

    • Sania Mirza Retirement: भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर आपल्या करिअरचा शेवट करणार असल्याचे सानिया मिर्झाने म्हटले आहे.
Sania Mirza Retirement

Sania Mirza Retirement: भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर आपल्या करिअरचा शेवट करणार असल्याचे सानिया मिर्झाने म्हटले आहे.

    • Sania Mirza Retirement: भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर आपल्या करिअरचा शेवट करणार असल्याचे सानिया मिर्झाने म्हटले आहे.

Sania Mirza Retirement: भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी पोहोचलेल्या सानियाने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन आणि दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर टेनिसला अलविदा करणार असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच येत्या काही महिन्यांत ती अखेरची कोर्टवर दिसणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

पुढील महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर करिअरचा शेवट करणार असल्याचे सानिया मिर्झाने म्हटले आहे. दुखापतीमुळे तिच्या २०२२च्या निवृत्तीच्या योजनांना विलंब झाला. दुखापतीमुळे यूएस ओपनमध्ये न खेळू शकल्यानंतर सानियाने ही घोषणा केली आहे.

३६ वर्षीय सानिया या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरीत कझाकस्तानच्या अना डॅनिलिनासोबत खेळेल. तिचा हा कोणत्याही ग्रँडस्लॅममध्ये शेवटचा सहभाग असेल. गेल्या वर्षी कोपराच्या दुखापतीमुळे ती यूएस ओपनला मुकली होती. अलिकडच्या काळात फिटनेसच्या इतर समस्याही त्याला सतावत आहेत.

सानिया म्हणाली, “खरे सांगायचे तर मी जी व्यक्ती आहे, मला माझ्या अटींवर काम करायला आवडते. त्यामुळे मला दुखापतीच्या कारणांमुळे स्पर्धांना मुकायचे नाही. म्हणूनच मी ट्रेनिंग घेत आहे. दुबईतील दुबई ड्युटी फ्री टेनिस चॅम्पियनशिपदरम्यान निवृत्त होण्याची माझी योजना आहे”.

सानिया मिर्झा ही भारतीय टेनिसची एक आयकॉन आहे. सहा ग्रँड स्लॅम जिंकण्याआधी आणि दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाची खेळाडू होण्याआधी, तिची एकेरी कारकीर्दही उल्लेखनीय होती. ती जागतिक क्रमवारीत २७ व्या क्रमांकावर होती, हीच तिची सर्वोत्तम रँकिंग राहिली आहे. २००५ मध्ये तिने यूएस ओपनची चौथी फेरी गाठली होती.

पुढील बातम्या