मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Abu Dhabi T10 लीगमध्ये फिक्सिंग! रैना-पोलार्डसह दिग्गज खेळाडूंनी खेळली फायनल, तपास सुरू

Abu Dhabi T10 लीगमध्ये फिक्सिंग! रैना-पोलार्डसह दिग्गज खेळाडूंनी खेळली फायनल, तपास सुरू

Jan 07, 2023, 11:34 AM IST

    • Abu Dhabi T10 League Spot-fixing: अबू धाबी T10 लीगचा सहावा सीझन २३ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान खेळला गेला. यामध्ये एकूण ८ संघांनी सहभाग घेतला होता. यात ३३ सामने झाले. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या संघ डेक्कन ग्लॅडिएटर्सने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
Abu Dhabi T10 League

Abu Dhabi T10 League Spot-fixing: अबू धाबी T10 लीगचा सहावा सीझन २३ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान खेळला गेला. यामध्ये एकूण ८ संघांनी सहभाग घेतला होता. यात ३३ सामने झाले. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या संघ डेक्कन ग्लॅडिएटर्सने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.

    • Abu Dhabi T10 League Spot-fixing: अबू धाबी T10 लीगचा सहावा सीझन २३ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान खेळला गेला. यामध्ये एकूण ८ संघांनी सहभाग घेतला होता. यात ३३ सामने झाले. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या संघ डेक्कन ग्लॅडिएटर्सने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.

क्रिकेटवर पुन्हा एकदा फिक्सिंगचे सावट पसरले आहे. अबू धाबी टी-१० लीगमध्ये फिक्सिंग झाल्याचे समोर आले आहे. आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने या प्रकरणी तपास सुरू केला आहे. २३ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान टी-१० क्रिकेट लीग युएईमध्ये खेळवली होती.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

ICC या स्पर्धेतील भ्रष्टाचाराच्या ६ प्रकरणांची चौकशी करत आहे. २ आठवडे चाललेल्या या स्पर्धेत एकूण ८ संघांचा समावेश होता आणि अंतिम सामन्यासह ३३ सामने खेळले गेले. फायनलमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सने न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा ३७ धावांनी पराभव केला होता.

ग्लॅडिएटर्सच्या वतीने सुरेश रैना, आंद्रे रसेल, निकोलस पूरन तर न्यू यॉर्कच्या संघातून किरॉन पोलार्ड, रशीद खान आणि ओरियन मॉर्गन हे स्टार क्रिकेटर्स मैदानात उतरले होते.

यूके डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक युनिटला T10 टूर्नामेंटमधील भ्रष्टाचाराच्या डझनहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आयसीसीचा तपास सट्टेबाजीवर केंद्रित आहे. सुमारे १५० कोटी रुपयांचा हा सट्टा असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, या लीगमधील सर्व ८ संघांचे स्पॉन्सर्स हे सट्टेबाजी कंपन्याच होत्या. रिपोर्टनुसार, संघांचे मालक हे गोलंदाजी आणि फलंदाजीचा क्रम आधीच ठरवत होते. तर अनेक फलंदाज असे फटके खेळून बाद झाले ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही.

दरम्यानस आता, आयसीसी या लीगचीही चौकशी करत आहे कारण सामन्यांदरम्यान संघ आणि त्यांच्या मालकांभोवती संशयास्पद गतिविधी होत असल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या. आयसीसी फ्रँचायझी मालकांच्या भूमिकेचीही चौकशी करत आहे. याआधीही क्रिकेटमध्ये सट्टेबाजीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिक्सिंगमुळे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरसह अनेक क्रिकेटपटूंना तुरुंगात जावे लागले होते. आयसीसीनेही त्यांच्यावर बंदी घातली होती. एस श्रीशांतसह अनेक भारतीय क्रिकेटपटूही याच्या कचाट्यात आले आहेत.

पुढील बातम्या