मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ Playing 11 : होम ग्राउंडवर होणार रजत पाटीदारचं पदार्पण? आज या खेळाडूंना संधी मिळू शकते

IND vs NZ Playing 11 : होम ग्राउंडवर होणार रजत पाटीदारचं पदार्पण? आज या खेळाडूंना संधी मिळू शकते

Jan 24, 2023, 10:41 AM IST

    • IND vs NZ 3rd ODI Playing 11: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा सामना जिंकून किवींना व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबतच भारतीय संघाला हा सामना जिंकून आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर येण्याची सुवर्णसंधी आहे.
IND vs NZ 3rd ODI Playing 11

IND vs NZ 3rd ODI Playing 11: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा सामना जिंकून किवींना व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबतच भारतीय संघाला हा सामना जिंकून आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर येण्याची सुवर्णसंधी आहे.

    • IND vs NZ 3rd ODI Playing 11: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा सामना जिंकून किवींना व्हाईट वॉश देण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबतच भारतीय संघाला हा सामना जिंकून आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर येण्याची सुवर्णसंधी आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज (२४ जानेवारी) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा १२ धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात आठ गडी राखून नेत्रदीपक विजय मिळवला होता. अशा परिस्थितीत 'मेन इन ब्लू'ने हा सामना जिंकल्यास त्यांना नंबर-वन होण्याची संधीही आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.

ट्रेंडिंग न्यूज

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

सलामीवीर शुभमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गिलने पहिल्या सामन्यात द्विशतक तर दुसऱ्या सामन्यात नाबाद ४० धावांची खेळी केली. कर्णधार रोहित शर्मानेही दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि आता तिसऱ्या सामन्यात त्याला मोठी धावसंख्या उभारायची आहे. त्याचवेळी श्रीलंकेविरुद्ध दोन आणि बांगलादेशविरुद्ध एक शतक झळकावणारा विराट कोहली पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता, त्यामुळे त्याचे लक्ष्यही मोठी खेळी खेळण्याचे असेल.

टी-20 नंबर-वन फलंदाज सूर्यकुमार यादवकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती पण मालिकेतील पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला. हार्दिक पांड्याही मधल्या फळीत पुरेसे योगदान देऊ शकला नाही. पदार्पणाच्या प्रतिक्षेत असलेला रजत पाटीदारही संघात आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन रजतला पदार्पणाची संधी देते की नाही हे पाहावे लागेल. पाटीदारने देशांतर्गत स्तरावर मध्य प्रदेशकडून खेळताना आपल्या कामगिरीने छाप पाडली आहे. 

तसेच, गोलंदाजी विभागात बदल होण्याची अधिक शक्यता आहे. मोहम्मद शमी किंवा मोहम्मद सिराजच्या जागी वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संधी मिळण्याची शक्यता आहे. फिरकी गोलंदाजी आक्रमणाचा प्रश्न असेल तर लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. तथापि, कुलदीप यादवला वगळले जाण्याची शक्यता नाही. वॉशिंग्टन सुंदरही प्लेइंग-११ मध्ये कायम राहण्याची अपेक्षा आहे.

दोन्ही संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रजत पाटीदार/हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरेल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, हेन्री शिपले/डग ब्रेसवेल, लॉकी फर्ग्युसन/जेकब डफी, ब्लेअर टिकनर.