मराठी बातम्या  /  क्रीडा  /  किंग कोहलीला नोव्हाक जोकोविचचा पाठिंबा, पीटरसनच्या पोस्टवर दिली प्रतिक्रिया

किंग कोहलीला नोव्हाक जोकोविचचा पाठिंबा, पीटरसनच्या पोस्टवर दिली प्रतिक्रिया

Jul 17, 2022, 09:33 PM IST

    • क्रिकेटपटूंशिवाय सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनेही विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे. जोकोविचने पीटरसनच्या ट्वीटला लाईक करून विराटला पाठिंबा दर्शवला आहे.
virat kohli

क्रिकेटपटूंशिवाय सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनेही विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे. जोकोविचने पीटरसनच्या ट्वीटला लाईक करून विराटला पाठिंबा दर्शवला आहे.

    • क्रिकेटपटूंशिवाय सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनेही विराट कोहलीला पाठिंबा दिला आहे. जोकोविचने पीटरसनच्या ट्वीटला लाईक करून विराटला पाठिंबा दर्शवला आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. इंग्लंड दौऱ्यावरही कोहलीची बॅट शांत आहे. फलंदाजीत सातत्याने अपयश येत असल्याने कोहलीवर चौफेर टीका होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

मात्र, या कठीण काळात कोहलीला काही दिग्गजांनी पाठिंबा दिला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने नुकतेच इन्स्टाग्राम पोस्ट करून भारतीय विराटचे समर्थन केले आहे. केवळ क्रिकेट दिग्गजच नाही तर इतर खेळातील खेळाडूही कोहलीला पूर्ण पाठिंबा देत आहेत, यावरून कोहलीच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येऊ शकतो.

क्रिकेटपटूं व्यतिरिक्त टेनिस दिग्गज आणि नुकतेच सातवे विम्बल्डन विजेतेपद पटकावणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनेही विराटला पाठिंबा दिला आहे. पीटरसनच्या इन्स्टाग्राम पोस्टवर जोकोविचने रिअॅक्ट केले आहे. पीटरसनच्या या पोस्टला लाइक करत जोकोविचने कोहलीला पाठिंबा दर्शवला आहे.

<p>kevin pietersen</p>

पीटरसनने पोस्टमध्ये म्हटले होते की, 'तु क्रिकेटमध्ये जे काही केले आहेस, त्याचे लोक फक्त स्वप्न पाहू शकतात. मित्रा, तुझी कारकीर्द अशी आहे की, सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाही वाटत असावं की, मी देखील अशी कामगिरी करु शकलो असतो तर. स्वताचा अभिमान बाळग आणि जीवनाचा आनंद घे. तु लवकर चांगली कामगिरी करशील".

दरम्यान,जोकोविचने अलीकडेच विम्बल्डनमध्ये २१ वे ग्रँडस्लॅम जिंकले आहे. त्याचे हे सातवे आणि सलग चौथे विम्बल्डन विजेतेपद आहे. पीटरसन आणि जोकोविचच्या आधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही खराब फॉर्ममध्ये असलेल्या कोहलीच्या समर्थनार्थ ट्विट केले होते.