मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : विल जॅकच्या दुखपातीमुळे RCB ला लॉटरी, न्यूझीलंडचा स्टार खेळाडू कमी किंमतीत संघात दाखल

IPL 2023 : विल जॅकच्या दुखपातीमुळे RCB ला लॉटरी, न्यूझीलंडचा स्टार खेळाडू कमी किंमतीत संघात दाखल

Mar 18, 2023, 01:53 PM IST

    • Michael Bracewell RCB ipl 2023 : इंग्लंडचा विल जॅक दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२३ मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. त्याच्या जागी आरसीबीने न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलचा संघात समावेश केला आहे.
Michael Bracewell RCB ipl 2023

Michael Bracewell RCB ipl 2023 : इंग्लंडचा विल जॅक दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२३ मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. त्याच्या जागी आरसीबीने न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलचा संघात समावेश केला आहे.

    • Michael Bracewell RCB ipl 2023 : इंग्लंडचा विल जॅक दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो आयपीएल २०२३ मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. त्याच्या जागी आरसीबीने न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलचा संघात समावेश केला आहे.

Michael Bracewell Joins RCB Team ipl 2023 : इंग्लंडचा फलंदाज विल जॅक्स दुखापतीमुळे (will jack injury) आयपीएलच्या (IPL 2023) आगामी मोसमातून बाहेर पडला आहे. त्याला यंदाच्या मिनी लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) ३.२ कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता आरसीबी व्यवस्थापनाने जॅकच्या जागी न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेलचा (Michael Bracewell RCB ipl 2023) संघात समावेश केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

ब्रेसवेलने अलीकडेच भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत झंझावाती शतक झळकावले होते. या वर्षी न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यावर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ७८ चेंडूत १४० धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने १२ चौकार आणि १० षटकार मारले.

ब्रेसवेलने त्याच्या कारकिर्दीत १६ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ११३ धावा केल्या असून २१ विकेट्स घेतल्या आहेत. तो १ कोटी रुपयांच्या मूळ किमतीवर आरसीबीमध्ये सामील होईल. ब्रेसवेलला आयपीएलच्या मिनी लिलावात कोणीही खरेदी केले नव्हते. तो कधीही आयपीएलमध्ये खेळला नाही. आरसीबी २ एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (RCB VS MI IPL 2023) सामन्याने आयपीएल मोहिमेला सुरुवात करेल.

तत्पूर्वी, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विल जॅकला दुखापत झाली होती. २४ वर्षीय जॅकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३.२ कोटी रुपयांना खरेदी केले होते. अहवालानुसार, स्कॅन आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर त्याने आयपीएलच्या आगामी हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. जॅकने या वर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडकडून पदार्पण केले. दुखापतीमुळे वनडे विश्वचषकासाठी इंग्लंड संघातील त्याचे स्थानही धोक्यात आले आहे.

आयपीएल २०२३ साठी RCB संघ

फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ऍलन, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोश वुडल , सिद्धार्थ कौल, आकाश दीप, सोनू यादव, अविनाश सिंग, राजन कुमार, मनोज भंडागे, हिमांशू शर्मा, रीस टोपले, मायकल ब्रेसवेल.