मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ 2nd T20 : दुसरा टी-20 पृथ्वी शॉ खेळणार? अर्शदीपला डच्चू मिळण्याची शक्यता, पाहा प्लेइंग ११

IND vs NZ 2nd T20 : दुसरा टी-20 पृथ्वी शॉ खेळणार? अर्शदीपला डच्चू मिळण्याची शक्यता, पाहा प्लेइंग ११

Jan 28, 2023, 10:10 PM IST

    • India vs New Zealand 2nd T20 playing 11 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल. मालिका वाचवण्यासाठी हा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे.
India vs New Zealand 2nd T20 playing 11

India vs New Zealand 2nd T20 playing 11 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल. मालिका वाचवण्यासाठी हा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे.

    • India vs New Zealand 2nd T20 playing 11 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना २९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल. मालिका वाचवण्यासाठी हा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे.

India vs New Zealand 2nd T20 Match : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (२९ जानेावरी) रोजी लखनौ येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियासाठी हा 'करो या मरो' सामना असेल. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा २१ धावांनी पराभव झाला होता. अशा स्थितीत मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला लखनौ येथील सामना जिंकावाच लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाने १९ षटकांपर्यंत सामना आपल्या ताब्यात ठेवला होता, पण अर्शदीप सिंगच्या एका षटकात (डावाचे २० वे षटक) २७ धावा निघाल्या. या धावाच भारताला महागात पडल्या. न्यूझीलंडने भारताला १७७ धावांचे लक्ष्य दिले होते. तेव्हा प्रत्युत्तरात टीम इंडियाची टॉप ऑर्डर अवघ्या १५ धावांत तंबूत परतली.

पृथ्वी शॉला संधी मिळेल का?

दुसऱ्या T20 मध्ये पृथ्वी शॉला संधी द्यायची की नाही हा कर्णधार हार्दिक पांड्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असेल. क्रिकेट तज्ज्ञांपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनी पृथ्वी शॉला संघात घेण्याची मागणी केली आहे. मात्र, एकाच सामन्यानंतर संघात बदल होईल, असे वाटत नाही. हार्दिक पांड्या पहिल्या टी-२० साठी जो संघ होता. त्याच संघासह दुसरा सामना खेळू शकतो. पण हार्दिक गोलंदाजी विभागात काही बदल करण्याची शक्यता आहे.

अर्शदीपच्या जागी युझी संघात येऊ शकतो

अर्शदीप सिंग पहिल्या T20 मध्ये भारताच्या पराभवाचे कारण ठरला होता. अशा परिस्थितीत त्याला दुसऱ्या टी-२० मध्ये प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची मागणी होत आहे. जर अर्शदीपला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले, तर युझवेंद्र चहलचे संघात पुनरागमन होऊ शकते.

शुभमन विरुद्ध पृथ्वी

शुभमन गिलने वनडेमध्ये अप्रतिम कामगिरी केली. आहे. मात्र टी-20 मध्ये तो सतत फ्लॉप ठरत आहे. आतापर्यंत झालेल्या ४ सामन्यांपैकी फक्त एकदाच त्याने दोन अंकी आकडा गाठला आहे. ३ सामन्यांत, तो एकाही डावात १० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही. तसेच, त्याचा स्ट्राईक रेटही अवघा ११९. ९२ इतकाच आहे.

याउलट पृथ्वी शॉच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ खूप मजबूत होईल. तो त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. शॉचा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५२.१४ चा स्ट्राइक रेट आहे, जो टीम इंडियामध्ये सूर्यकुमार यादवपेक्षाही जास्त आहे.

दुसऱ्या T20 साठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा, शिवम मावी, उमरान मलिक, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग.