मराठी बातम्या  /  क्रीडा  /  नीना गुप्ता-व्हीव रिचर्ड्स पहिल्यांदा कुठे भेटले? कसं सुरू झालं प्रेम प्रकरण? पाहा

नीना गुप्ता-व्हीव रिचर्ड्स पहिल्यांदा कुठे भेटले? कसं सुरू झालं प्रेम प्रकरण? पाहा

Jan 28, 2023, 07:28 PM IST

  • Neena Gupta Vivian Richards love story : नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा गुप्ता ही अभिनेत्री आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. मसाबाने बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रासोबत तिने लग्नगाठ बांधली आहे.

Neena Gupta-Vivian Richards love story

Neena Gupta Vivian Richards love story : नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा गुप्ता ही अभिनेत्री आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. मसाबाने बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रासोबत तिने लग्नगाठ बांधली आहे.

  • Neena Gupta Vivian Richards love story : नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा गुप्ता ही अभिनेत्री आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. मसाबाने बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रासोबत तिने लग्नगाठ बांधली आहे.

vivian richards joins daughter masaba wedding : फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता पुन्हा एकदा बोहल्यावर चढली आहे. बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रासोबत तिने लग्नगाठ बांधली आहे. मसाबा ही वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची मुलगी आहे. अतिशय खाजगी सोहळ्यात हा विवाह पार पडला असून, याचे काही फोटो आता सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. या विवाह सोहळ्यास मसाबाचे वडील सर व्हिव्हियन रिचर्ड्स हे मुंबईत आले होते. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यातील नात्याची सर्वांनाच कल्पना आहे. व्हीव्ह आधीच विवाहित असल्याने त्यांनी नीना गुप्तांसोबत लग्न करण्यास नकार दिला होता. त्यावेळी नीना या गरोदर होत्या. १९८८ मध्ये त्यांनी मसाबाला जन्म दिला. मुलीला जगात आणण्याचा निर्णय नीना यांचा होता. मसाबाला नीना यांनी एकटीनेच वाढवले.

नीना-आणि व्हीव यांचे हे अफेअर काही साधेसुधे अफेअर नव्हते.  नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या प्रेमप्रकरणाने त्यावेळी संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. नीना आणि व्हीव यांनी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला पण या प्रेमाला कधीच अधिकृत मान्यता मिळू शकली नाही.

व्हीव रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची भेट कशी झाली?

व्हीव रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची पहिली भेट जयपूरमध्ये झाली होती. त्यावेळी नीना विनोद खन्नासोबत एका चित्रपटासाठी शूटिंग करत होत्या. दरम्यान, जयपूरच्या महाराणींनी चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. व्हीव रिचर्ड्सही तिथे त्यांच्या वेस्ट इंडिज संघासोबत उपस्थित होते. तिथे त्यांची पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू  ते रिलेशनशीपमध्ये आले.

सर व्हीव रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता ही एक अभिनेत्री आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. नीना यांनी मुलगी मसाबापासून कधीही काहीही लपवले नाही. व्हीवसोबतच्या नात्याबद्दलही त्यांनी सर्व काही स्पष्टपणे सांगितले होते. 

विभाग

पुढील बातम्या