मराठी बातम्या  /  क्रीडा  /  GT Vs CSK IPL 2023 : आयपीएलचा पहिला सामना गुजरात टायटन्सने जिंकला, सीएसकेचा शेवटच्या षटकात पराभव

GT Vs CSK IPL 2023 : आयपीएलचा पहिला सामना गुजरात टायटन्सने जिंकला, सीएसकेचा शेवटच्या षटकात पराभव

Mar 31, 2023, 11:46 PM IST

    • GT Vs CSK IPL 2023 highlights : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला. सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने शेवटच्या षटकांत लक्ष्य गाठले.
GT Vs CSK IPL 2023 highlights

GT Vs CSK IPL 2023 highlights : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला. सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने शेवटच्या षटकांत लक्ष्य गाठले.

    • GT Vs CSK IPL 2023 highlights : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला. सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने शेवटच्या षटकांत लक्ष्य गाठले.

शुभमन गिलच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर गुजरात टायटन्सने आयपीएलच्या १६व्या मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जने २० षटकात ७ विकेट गमावत १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.२ षटकांत ५ बाद १८२ धावा करत सामना जिंकला.

ट्रेंडिंग न्यूज

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

Vinesh Phogat : ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये विनेश फोगटचा राडा, कुस्तीच्या ट्रायल्स ३ तास थांबवल्या

शेवटच्या तीन षटकात गुजरातला ३० धावा करायच्या होत्या, अशा परिस्थितीत सामना रोमांचक वळणावर आला होता. राहुल तेवतिया आणि रशीद खान यांनी शानदार खेळ दाखवत चेन्नईचा विजय हिरावून घेतला. तेवतियाने नाबाद १५ धावांची खेळी खेळली आणि रशीदने १० धावा केल्या. गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्याचवेळी विजय शंकरने २७ आणि ऋद्धिमान साहाने २५ धावा केल्या. सीएसकेकडून राजवर्धन हंगरगेकरने सर्वाधिक ३ बळी घेतले.

चेन्नई-गुजरात यांच्यातील या सलामीच्या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उद्धाटन सोहळ्यात अरिजित सिंग, रश्मिका मंदान्ना, तमन्ना भाटिया या स्टार्सनी उद्घाटन सोहळ्यात आपली कला सादर केली.

चेन्नईचा डाव

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ९२ धावा केल्या. त्याच्याशिवाय मोईन अलीने २३ धावांची खेळी केली. धोनीने अखेरच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाची धावसंख्या ७ बाद १७८ पर्यंत नेली. त्याने सात चेंडूत १४ धावा केल्या.

गुजरातकडून राशिद खान, अलझारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी जोशुआ लिटलला एक विकेट मिळाली.