मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ब्राझीलच्या दिग्गज फुटबॉलपटूवर जीवघेणा हल्ला, २९ गोळ्या झाडल्या!

ब्राझीलच्या दिग्गज फुटबॉलपटूवर जीवघेणा हल्ला, २९ गोळ्या झाडल्या!

Jun 04, 2022, 01:57 PM IST

    • ब्राझीलमधील एका नाईट क्लबच्या बाहेर एक पोलीस कर्मचारी फुटबॉलपटू इमर्सनसोबत फोटो काढत होता. त्यावेळी इमर्सनवर एक दरोडेखोराने त्याला लुटण्याच्या उद्देशाने हल्ला केला.
emerson royal

ब्राझीलमधील एका नाईट क्लबच्या बाहेर एक पोलीस कर्मचारी फुटबॉलपटू इमर्सनसोबत फोटो काढत होता. त्यावेळी इमर्सनवर एक दरोडेखोराने त्याला लुटण्याच्या उद्देशाने हल्ला केला.

    • ब्राझीलमधील एका नाईट क्लबच्या बाहेर एक पोलीस कर्मचारी फुटबॉलपटू इमर्सनसोबत फोटो काढत होता. त्यावेळी इमर्सनवर एक दरोडेखोराने त्याला लुटण्याच्या उद्देशाने हल्ला केला.

ब्राझीलचा (brazil) दिग्गज फुटबॉलपटूंपैकी (footballer) इमर्सन रॉयल (emerson royal) हा एका मोठ्या हल्ल्यातून वाचला आहे. एका दरोडेखोराने इमर्सन रॉयलवर जीवघेणा हल्ला केला आहे. सुदैवाने इमर्सन रॉयल यातून सुखरूप बचावला. एका पोलीस कर्मचाऱ्याने इमर्नसनला या हल्ल्यातून वाचवले आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री तीन वाजता ही गंभीर घटना घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

ब्राझीलमधील एका नाईट क्लबच्या बाहेर एक पोलीस कर्मचारी फुटबॉलपटू इमर्सनसोबत फोटो काढत होता. त्यावेळी इमर्सनवर एक दरोडेखोराने त्याला लुटण्याच्या उद्देशाने हल्ला केला. इमर्सनला बंदूक दाखवत त्याच्याकडील पैसे मागितले. मात्र, तिथे उपस्थित पोलीस ऑफीसरने आपला जीव धोक्यात घालून इमर्सनला या संकटातून वाचवले आहे. यावेळी पोलीस आणि त्या दरोडेरामध्ये २९ राऊंड फायरिंग झाली. या फारिंगमध्ये दरोडेखोर गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात नेण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेनंतर इमर्सनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे, त्यात त्याने पोलीस कर्मचाऱ्याचे आभार मानले आहेत. तो म्हणाला की, 'मी तुमचा सदैव ऋणी राहीन, देव सदैव तुमच्या सारखे देवदूत या पृथ्वीवर पाठवत राहतो. याचा पुरावा मला आज माझ्या आयुष्यात मिळाला आहे'.

विभाग