मराठी बातम्या  /  क्रीडा  /  भारतानं कझाकिस्तानमध्ये फडकावला तिरंगा, साक्षी मलिकसह दोन कुस्तीपटूंना सुवर्णपदक

भारतानं कझाकिस्तानमध्ये फडकावला तिरंगा, साक्षी मलिकसह दोन कुस्तीपटूंना सुवर्णपदक

Jun 04, 2022, 12:45 PM IST

    • साक्षीने पाच वर्षांत प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकले आहे. या आधी साक्षीने २०१७ च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. यानंतर तिने आशियाई चॅम्पियनशिप २०२० आणि २०२२ मध्ये कांस्यपदक जिंकले.
साक्षी मलिक

साक्षीने पाच वर्षांत प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकले आहे. या आधी साक्षीने २०१७ च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. यानंतर तिने आशियाई चॅम्पियनशिप २०२० आणि २०२२ मध्ये कांस्यपदक जिंकले.

    • साक्षीने पाच वर्षांत प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकले आहे. या आधी साक्षीने २०१७ च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. यानंतर तिने आशियाई चॅम्पियनशिप २०२० आणि २०२२ मध्ये कांस्यपदक जिंकले.

भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कझाकिस्तानमधील UWW रँकिंग सिरीज इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी साक्षी ही तिसरी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. मानसी अहलावत आणि दिव्या काकरन यांनीही या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

साक्षीने पाच वर्षांत प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकले आहे. या आधी साक्षीने २०१७ च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर तिने आशियाई चॅम्पियनशिप २०२० आणि २०२२ मध्येही कांस्यपदक जिंकले होते.

साक्षीने कझाकिस्तानच्या इरिना कुझनेत्सोव्हाविरुद्ध तांत्रिक श्रेष्ठतेच्या बळावर विजय मिळवला. त्यानंतर तिने उझबेकिस्तानच्या रुसाना अब्दिरासुलोव्हा हिचा ९-३ असा पराभव केला. उपांत्य फेरीत मंगोलियाच्या सेरेंचिमेड सुखीने सामन्याआधीच पराभव स्वीकारला. या दोघींमध्ये सामना झाला नाही. त्यानंतर अंतिम फेरीत साक्षी मलिकसमोर पुन्हा एकदा कझाकिस्तानची कुझनेत्सोव्हा होती. याही सामन्यात तिला पराभव स्वीकारावा लागला. साक्षीने हा विजेतेपदाचा सामना ७-४ असा जिंकला.

या सोबतच, मानसी अहलावतने ५७ किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या एमा त्सिनाचा ३-० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी, दिव्या काकरनने ६८ किलो वजनी गटात मंगोलियाच्या डेलग्रेमा एन्खसाईखान आणि कझाकिस्तानच्या अल्बिना कारगेलदिनोव्हा यांचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. मात्र, तिथे तिला मंगोलियाच्या बोलोर्तुंगलाग झोरिट हिच्या विरुद्ध १०-१४ असा पराभव पत्करावा लागला.

दिव्याप्रमाणेच जोरिटनेही दोन सामने जिंकले आणि एकात तिला पराभवाचा सामना करावा लागला. चार पैलवानांच्या या इव्हेंटमध्ये सर्वात चांगली कामगिरी केल्याने दिव्याला विजेता घोषित करण्यात आले. अशा प्रकारे भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले.

पुढील बातम्या