मराठी बातम्या  /  क्रीडा  /  अर्जुन तेंडुलकरला कपिल देव यांचा मोलाचा सल्ला, म्हणाले…

अर्जुन तेंडुलकरला कपिल देव यांचा मोलाचा सल्ला, म्हणाले…

Jun 04, 2022, 12:46 PM IST

    • भारताचा माजी कप्तान आणि अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी अर्जुन तेंडुलकरला एक मोलाचा सल्ला दिला आहे.
अर्जुन तेंडुलकर आणि कपिल देव (हिंदुस्तान टाइम्स)

भारताचा माजी कप्तान आणि अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी अर्जुन तेंडुलकरला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

    • भारताचा माजी कप्तान आणि अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी अर्जुन तेंडुलकरला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स (Arjun Tendulkar) संघाने यावर्षीच्या आयपीएलमध्ये(IPL) ३० लाख रुपयांच्या बोलीवर विकत घेतलं होतं. मात्र मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघातून अनेक नवोदित खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली मात्र अर्जुन तेंडुलकर अजूनही संघाचा राखीव खेळाडू म्हणून डगआऊटमध्ये बसलेला पाहायला मिळाला. ऋतीक शौकीन ते कुमार कार्तिकेय सर्वच नवोदित खेळाडू मुंबईच्या संघातनं खेळताना पाहायला मिळाले मात्र अर्जुन तेंडुलकर खेळण्याच्या फक्त अफवाच पाहायला मिळाल्या. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

अशात आता भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि त्यावेळच्या श्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक कपिल देव यांनी अर्जुन तेंडुलकरला एक मोलाचा सल्ला दिलाय. अर्जुन तेंडुलकर एक वेगवान गोलंदाज आहे. अर्जुन तेंडुलकरसाठी एक मोठी समस्या आहे ती म्हणजे त्याच्या नावापुढे लागलेलं तेंडुलकर हे आडनाव. कपिल यांच्या मते अर्जुन याच्या वडिलांनी म्हणजेच सचिन तेंडुलकरने इतकी जबरदस्त कामगिरी केली आहे ज्या कामगिरीची जगात कुठेच तोड नाही. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरने आपल्या वडिलांच्या ५० टक्के जरी कामगिरी करुन दाखवली तरी अर्जुन तेंडुलकर आपल्या करिअरमध्ये यशस्वी होईल. मुंबईच्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डने अर्जुन तेंडुलकरला एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जुनला गोलंदाजीत अजून काही धडे गिरवायचे आहेत.

आता कपिल देव यांनी अर्जुन तेंडुलकर याला हेच आडनाव विसरा असं सांगितलं आहे. आजकालच्या क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांनी सेट केलेले स्टॅन्डर्डस खूप जास्त आहेत. त्यामुळे फक्त आपल्या खेळावर फोकस करण्याचा सल्ला दिलाय. अर्जुनची तुलना त्याच्या वडिलांशी करणं योग्य नसल्याचं कपिल देव यांचं म्हणणं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अर्जुनला त्याचा खेळाचा आनंद घेता आला पाहिजे. 

काय म्हणतायत कपिल देव?

प्रत्येकजण अर्जुनला का बरं बोलत आहेत? तो सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे म्हणून? त्याला त्याचा खेळ खेळू द्यावा आणि त्याची सचिनसोबत तुलना करु नये. तेंडुलकर नावाचा जसा फायदा आहे तसं नुकसानही आहे. डॉन ब्रॅडमनच्या मुलां त्याचं आडनाव बदललं कारण त्याला त्या आडनावाचा त्रास होत होता. त्यांन सर डॉन ब्रॅडमन यांच्यासारखं खेळावं अशी त्याच्याकडून अपेक्षा ठेवण्यात आली होती.अर्जुनला मुंबईच्या टी20 लीगच्या दोन सामन्यात खेळताना पाहायला मिळालं आहे. भारतीय संघाने अर्जुन तेंडुलकरला नेट बॉलर म्हणून कायम वापरलं आहे. अर्जुनने आजवर विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिह धोनी यांच्या सारख्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी केली आहे. अर्जुनने अपेक्षांचं ओझं घेऊन खेळू नये असं कपिल देव यांचं म्हणणं आहे. त्यानं त्याच्या वडिलांच्या किर्तीच्या अर्धी किर्ती जरी मिळवली तरी अर्जुन यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही.

अर्जुनवर अपेक्षांचं ओझं लादू नका. तो तरुण आहे. जेव्हा त्याचे वडिल सचिन तेंडुलकर आहेत तेव्हा आपण त्याला काही सल्ला देणं अयोग्य आहे. मात्र तरीही मी त्याला एक गोष्ट सांगू इच्छितो ती म्हणजे आपल्या खेळाचा आनंद घे. तुला काहीही सिद्ध करायची गरज नाही.तर तू तुझ्या वडिलांच्या 50 टक्के खेळ जरी दाखवला तरीही ती खूप मोठी कामगिरी होईल. जेव्हा तेंडुलकर नाव येतं तेव्हा अपेक्षा स्वाभाविकपणे उंचावल्या जातात. कारण सचिन तेंडुलकरने केलेली कामगिरी. असं कपिल देव म्हणालेत.

पुढील बातम्या