मराठी बातम्या  /  क्रीडा  /  टेनिस मॅचदरम्यान महिलेने नेटला बांधून घेतलं, कारण ऐकून तुम्हीही पाठिंबा द्याल

टेनिस मॅचदरम्यान महिलेने नेटला बांधून घेतलं, कारण ऐकून तुम्हीही पाठिंबा द्याल

Jun 04, 2022, 01:16 PM IST

    • सेमी फायनलमध्ये कॅस्पर रुडने दणदणीत विजय नोंदवला आहे.
फ्रेंच ओपन

सेमी फायनलमध्ये कॅस्पर रुडने दणदणीत विजय नोंदवला आहे.

    • सेमी फायनलमध्ये कॅस्पर रुडने दणदणीत विजय नोंदवला आहे.

फ्रेंच ओपन २०२२ (french open 2022) मधील सेमीफायनलचा दुसरा सामना हा नॉर्वेच्या कॅस्पर रुड (Casper Ruud) आणि क्रोएशियाच्या मारिन सिलीस (Marin Cilic) यांच्यात झाला. या सामन्यादरम्यान एक घटना घडली. सामना सुरु असताना एक महिला टेनिस कोर्टवर पोहोचली. तिथे तिने स्वत:ला कोर्टवरील नेटला बांधून घेतले. यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला होता. त्यानंतर त्या महिलेला सुरक्षा रक्षक मैदानाबाहेर घेऊन गेले. ही महिला हवामान बदलाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शन करत होती. सामन्यादरम्यान मैदानात पोहोचून तिने सर्वांना सावधानतेचा इशारा दिला आहे. 'आपल्याकडे फक्त १०२८ दिवस शिल्लक आहेत, ज्यामध्ये आपण आपली पृथ्वी वाचवू शकतो', असे ती म्हणत होती. सामन्या दरम्यान प्रदर्शन करणाऱ्या महिलेने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. तसेच टी-शर्टवर 'आपल्याकडे केवळ १०२८ दिवस राहिले आहेत', असे लिहिले होते.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, दुसऱ्या सेमी फायनलमध्ये कॅस्पर रुडने दणदणीत विजय नोंदवला आहे. सामन्याच्या सुरुवातीला तो लयीत दिसला नाही, नॉर्वेच्या रुड सुरुवातीला सिलिसच्या हल्ल्यांचा बचाव करताना दिसला. यातच त्याचा पहिल्या सेटमध्ये ३-६ अशा फरकाने पराभव झाला. यानंतर रुडने आक्रमक खेळ करत क्रोएशियाच्या सिलिसवर दबाव आणला. त्याने दुसरा सेट ६-४ अशा फरकाने जिंकला. त्यानंतर रुडने आक्रमक खेळ सुरुच ठेवला. त्याने तिसरा सेट ६-२ तर चौथा सेटही ६-२ अशा फरकाने जिंकून सामना आपल्या खिशात घातला. आता नॉर्वेच्या २३ वर्षीय कॅस्पर रुडचा सामना फायनलमध्ये स्पेनच्या राफेल नदालसोबत होणार आहे.

नदाल याआधीच फायनलमध्ये पोहोचला आहे. त्याला जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हविरुद्ध वॉकओव्हर मिळाला. सामन्यातील दुसऱ्या सेटमध्ये झ्वेरेव्ह जखमी झाला. टेनिस कोर्टवरच त्याच्या पायाला दुखापत झाली. यामुळे तो पुढे खेळू शकला नाही.

पुढील बातम्या