मराठी बातम्या  /  क्रीडा  /  FIFA WC 2022: फिफा वर्ल्डकप भारतात फ्लॉप? टीव्ही रेटिंगमध्ये मोठी घसरण

FIFA WC 2022: फिफा वर्ल्डकप भारतात फ्लॉप? टीव्ही रेटिंगमध्ये मोठी घसरण

Dec 06, 2022, 01:58 PM IST

    • FIFA WC 2022, TV Ratings in india Down: फिफा विश्वचषकात आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू होणार आहेत. मात्र भारतात फिफा वर्ल्डकप फ्लॉप ठरल्याचे समोर आले आहे.यावेळचा विश्वचषक भारतात फारच कमी प्रमाणात पाहिला गेल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. 
FIFA WC 2022

FIFA WC 2022, TV Ratings in india Down: फिफा विश्वचषकात आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू होणार आहेत. मात्र भारतात फिफा वर्ल्डकप फ्लॉप ठरल्याचे समोर आले आहे.यावेळचा विश्वचषक भारतात फारच कमी प्रमाणात पाहिला गेल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे.

    • FIFA WC 2022, TV Ratings in india Down: फिफा विश्वचषकात आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू होणार आहेत. मात्र भारतात फिफा वर्ल्डकप फ्लॉप ठरल्याचे समोर आले आहे.यावेळचा विश्वचषक भारतात फारच कमी प्रमाणात पाहिला गेल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. 

कतारमध्ये सुरू असलेला फिफा विश्वचषक २०२२ आता अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या राऊंड ऑफ १६ फेरीचे सामने सुरू आहेत. या फेरीतील विजेते संघ क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरत आहेत. भारतातही फुटबॉल विश्वचषकाची प्रचंड क्रेझ आहे. परंतु अलीकडेच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ताज्या टीव्ही रेटिंगवरून यावेळचा फिफा वर्ल्डकप भारतात फ्लॉप ठरल्याचे दिसून येत आहे. कारण FIFA विश्वचषकातील सामन्यांची भारतातील टीव्ही रेटिंगमध्ये प्रचंड घसरण झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

भारतातील टीव्ही रेटिंगमध्ये घसरण

इनसाइड स्पोर्टच्या रिपोर्टनुसार, FIFA विश्वचषक २०२२ च्या पहिल्या १० सामन्यांच्या रेटिंगमध्ये सुमारे १०-१५ टक्क्यांची घसरण झाली आहे. ही तुलना FIFA विश्वचषक २०१८ च्या पहिल्या १० सामन्यांशी करण्यात आली आहे. यावरूनच भारतातील फुटबॉल विश्वचषकाचे प्रसारण प्लॉप ठरल्याचे दिसून येते.

या रिपोर्टमध्ये BARC च्या आकडेवारीचाही हवाला देण्यात आला आहे. या आकडेवारीवरून सांगण्यात आले की, फिफा वर्ल्डकप २०२२च्या उद्घाटन समारंभाचा रीच देखील केवळ ९.७ मिलियनपर्यंतच होता. विशेष म्हणजे यापेक्षा जास्त रिच भारतातील कबड्डी लीगला मिळतो.

अमेरिका-इंग्लंड सर्वाधिक पाहिला गेलेला सामना

एकीकडे, भारतातील फिफा विश्वचषक २०२२ च्या टीव्ही रेटिंगमध्ये घसरण झाली आहे. तर दुसरीकडे, जगातील विविध देशांमध्ये यावेळी टीव्ही रेटिंगमध्ये बंपर वाढ झाली आहे. अमेरिका आणि इंग्लंड यांच्यातील फुटबॉल सामना हा अमेरिकेच्या टीव्ही इतिहासातील सर्वाधिक पाहिला गेलेला फुटबॉल सामना ठरला असल्याची माहिती फिफाकडून देण्यात आली आहे.

जपान-जर्मनी, स्पेनमध्ये टीव्ही रेटिंगमध्ये बंपर वाढ

अमेरिकेशिवाय जपान, जर्मनी आणि स्पेनमध्येही टीव्ही रेटिंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भारतातील टीव्ही रेटिंग कमी होण्यामागे अनेक कारणे असल्याचे मानले जाते आहे. यापैकी पहिले कारण म्हणजे स्पर्धेत भारताचा संघ नसणे, तसेच, सामन्यांची वेळ, सोबतच नवीन टीव्ही चॅनेलवर विश्वचषकाचे सामने प्रसारित करणे आणि डिजिटलवर फ्रीमध्ये प्रसारण करणे यांसारखी कारणे टीव्ही रेटिंग कमी होण्यामागे सांगितली जात आहेत.