मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Viral Video: फुटबॉलसाठी जीव धोक्यात घातला, ६ मित्रांनी ‘असा’ काढला विहिरीत पडलेला चेंडू

Viral Video: फुटबॉलसाठी जीव धोक्यात घातला, ६ मित्रांनी ‘असा’ काढला विहिरीत पडलेला चेंडू

Dec 05, 2022, 05:53 PM IST

    • सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगा सायकलच्या सहाय्याने विहिरीत पडलेला फुटबॉल बाहेर काढताना दिसत आहे. या कामात त्याचे मित्र त्याला मदत करत आहेत.
Viral Video

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगा सायकलच्या सहाय्याने विहिरीत पडलेला फुटबॉल बाहेर काढताना दिसत आहे. या कामात त्याचे मित्र त्याला मदत करत आहेत.

    • सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगा सायकलच्या सहाय्याने विहिरीत पडलेला फुटबॉल बाहेर काढताना दिसत आहे. या कामात त्याचे मित्र त्याला मदत करत आहेत.

कतारमध्ये सुरू असलेला फिफा वर्ल्डकप सध्या रोमहर्षक वळणावर पोहोचला आहे. स्पर्धेत सध्या राऊंड ऑफ १६ थरार सुरू आहे. तसेच, भारतातदेखील फुटबॉलची क्रेझ कमी नाही. देशातील असंख्य फुटबॉलप्रेमी आपापल्या आवडत्या संघांना फॉलो करताना आणि त्यांचे सामने पाहताना दिसत आहेत. मात्र, या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही मुले एकत्रितपणाने काहीतरी काम करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एक मुलगा आपला जीव धोक्यात घालून काही तरी करताना दिसत आहे, तर त्याचे साथीदार त्याला मदत करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतर लक्षात येते की व्हिडीओमधील मुले विहिरीत पडलेला फुटबॉल बाहेर काढण्याचे काम करत होते. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही.

विहिरीतून फुटबॉल बाहेर काढला

सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. नरेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा आपला जीव धोक्यात घालून विहिरीत पडलेला फुटबॉल बाहेर काढताना दिसत आहे. यादरम्यान तो सायकलच्या टायरला धरून विहिरीत लटकलेला दिसत आहे. तसेच, तो याच अवस्थेत पायाने फुटबॉल वर खेचताना दिसत आहे.

व्हिडिओमधील मुलगा पायाच्या साहाय्याने फुटबॉल वर खेचताना दिसत आहे. फुटबॉल बाहेर काढल्यानंतर विहिरीतून बाहेर येताना त्याच्या ६ साथीदारांनी सायकलचा दुसरा भाग धरलेला दिसत आहे. त्यामुळे ती व्यक्ती विहिरीत लटकली होती. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच वेळी, हा व्हिडीओ पाहणारे नेटकरी फुटबॉल बाहेर काढणाऱ्या व्यक्तीला खतरो का खिलडी म्हणत आहेत.

पुढील बातम्या