मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Hasan Ali Video: सामन्यादरम्यान अश्‍लील शेरेबाजी, हसन अली आणि प्रेक्षकांमध्ये हाणामारी

Hasan Ali Video: सामन्यादरम्यान अश्‍लील शेरेबाजी, हसन अली आणि प्रेक्षकांमध्ये हाणामारी

Dec 06, 2022, 11:29 AM IST

    • Hasan Ali Viral Video: एका क्लब सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहते हसन अलीवर आक्षेपार्ह कमेंट करत होते. यामुळे हसन अली संतप्त झाला आणि त्याने आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या प्रेक्षकांना मारण्यास धाव घेतली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Hasan Ali Video

Hasan Ali Viral Video: एका क्लब सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहते हसन अलीवर आक्षेपार्ह कमेंट करत होते. यामुळे हसन अली संतप्त झाला आणि त्याने आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या प्रेक्षकांना मारण्यास धाव घेतली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    • Hasan Ali Viral Video: एका क्लब सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहते हसन अलीवर आक्षेपार्ह कमेंट करत होते. यामुळे हसन अली संतप्त झाला आणि त्याने आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या प्रेक्षकांना मारण्यास धाव घेतली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. एकेकाळी आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज असलेला हसन अली आता तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघातून बाहेर आहे. तो सध्या क्लब क्रिकेट खेळत असून राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

मात्र, तेथेही त्याच्यासाठी काहीच चांगले घडताना दिसत नाही. एका क्लब सामन्यादरम्यान हसन अलीला प्रेक्षकांनी इतका त्रास दिला की, रागाच्या भरात तो त्यांना मारण्यासाठी धावला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर प्रचंड प्रतिक्रिया आहेत.

२८ वर्षीय हसन अलीला एका क्लब सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी खूपच त्रास दिला. सामन्यादरम्यान सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या हसन अलीवर अशोभनीय आणि अभद्र टिप्पणी करण्यात आली. हे टाळण्यासाठी तो मैदानाच्या मध्यभागी क्षेत्ररक्षणासाठी गेला. मात्र, तरीही प्रेक्षक त्याला त्रास देतच राहिले. त्याच्यावर आक्षेपार्ह कमेंट करतच राहिले.

यानंतर मात्र, हसन अलीचा संयम सुटला. त्याने ट्रोल करणाऱ्या प्रेक्षकांना मारण्यासाठी धाव घेतली. तर आयोजकांनी हसनला आवरण्यासाठी धाव घेतली आणि त्याला तसे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर हसन अलीची चांगलीच टर उडवली जात आहे.

प्रेक्षक हसन अलीला काय म्हणत होते?

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आरिफ वाला जिल्ह्यात हा सामना सुरू होता. यावेळी प्रेक्षक हसन अलीला सध्या तो पाकिस्तान संघाचा भाग नाही, यावरून चिडवत होते. तसेच त्याने २०२१ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियावरूद्ध महत्वपूर्ण झेल सोडला होता. त्यानंतर पाकिस्तान सेमी फायनलमधून बाहेर पडला. या घटनेवरूनदेखील हसनला प्रेक्षक ट्रोल करत होते.

२०२२ च्या टी-20 वर्ल्डकपपूर्वी हसनला पाकिस्तान टीममधून वगळण्यात आले. पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असून हसन या संघाचा भाग नाही. हसनने आशिया कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो संघातून बाहेर झाला.

हसनने पाकिस्तानकडून २१ कसोटीत ७७ विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९१ आणि टी-20 मध्ये ६० विकेट्स आहेत.

पुढील बातम्या